मुंबई – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा (UPSC) परीक्षेत नाशिक येथील प्रेरणा कैलास खवळे हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या दैदीप्यमान कामगिरीबद्दल अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी), मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक Sunil Ware तसेच निबंधक Indira Aswar यांनी तिचा विशेष गौरव केला आहे.
ऑगस्ट २०२५ मध्ये नागरी सेवा मुख्य परीक्षा पार पडली होती, तर डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला असून त्यामध्ये नाशिकच्या प्रेरणा खवळे हिने ९१३ वा क्रमांक मिळवत प्रशासकीय सेवेत जाण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे.
‘आर्टी’चे पाठबळ
प्रेरणा ही मातंग समाजातील असून तिने मिळवलेले हे यश समाजासाठी प्रेरणादायी ठरले आहे. अनुसूचित जातीतील, विशेषतः मातंग समाजातील विद्यार्थ्यांना यूपीएससी मुलाखतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या Anna Bhau Sathe Research and Training Institute (आर्टी), मुंबईच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते. प्रेरणालाही या योजनेचा लाभ मिळाल्याने तिच्या मुलाखतीच्या तयारीदरम्यान येणारे आर्थिक अडथळे दूर होण्यास मोठी मदत झाली.
“अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत प्रेरणाने मिळवलेले यश हे तिच्या जिद्दीचे आणि अथक परिश्रमाचे फलित आहे. आर्टीच्या माध्यमातून यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्ली येथील नामांकित संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. तसेच मुलाखतीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना आर्टीकडून आर्थिक सहाय्य दिले जाते, त्यामुळे त्यांच्या स्वप्नांना बळ मिळते,” असे मत व्यवस्थापकीय संचालक Sunil Ware यांनी व्यक्त केले.
‘यूपीएससी’ परीक्षेत प्रेरणा खवळेचे दैदीप्यमान यश;
‘आर्टी’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांच्याकडून गौरव
By Team LBNN
On: March 6, 2026 8:42 PM
---Advertisement---





