सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा समारोप : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

On: December 9, 2025 2:39 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – आताचा प्रवास हा अज्ञानाकडून ज्ञानाकडे, ज्ञानाकडून विज्ञानाकडे आणि विज्ञानाकडून तंत्रज्ञानाकडे झाला आहे. आजचे जग हे संपूर्णपणे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगत दिशेने वेगाने धावत असल्याचे निदर्शनास आणून देत विद्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक करताना विज्ञानातील प्रयोगशीलता, संशोधन वृत्ती आणि कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, साताराचे कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के अधोरेखित केले.
     फलटण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी, ता. फलटण यांच्या संयुक्त सहभागाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन  समारोप व पारितोषिक वितरण समारंभात कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यांनी विज्ञान प्रदर्शनास भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी निवृत्त प्राचार्य रविंद्र येवले, अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी, ग्रामीण कथाकथनकार प्रा. रविंद्र कोकरे, फलटण एज्युकेशन सोसायटी नियामक मंडळ सदस्य रणजित निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे संचालक मोहनराव डांगे, कोळकी ग्रामपंचायत उपसरपंच अशोक नाळे, मनोज पवार, गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती, तालुका समन्वयक दमयंती कुंभार, सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका संध्या गायकवाड, प्राचार्या सुजाता गायकवाड व त्यांचे सहकारी शिक्षक/शिक्षिका आणि विज्ञान प्रदर्शनात सहभागी तालुक्यातील १९० शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
       समारोपापूर्वी आयोजित परिसंवादात प्राचार्य रविंद्र येवले सर,  कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के, गटशिक्षणाधिकारी सी. जी. मठपती यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची वैज्ञानिक भाषेत उत्तरे दिली. अतिशय ज्ञानपूर्ण व मुक्त संवाद याठिकाणी झाला. याचा आस्वाद सर्व सहभागी विद्यार्थी व शिक्षकांनी घेतला.
      संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड यांनी ३ दिवसांच्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास तालुक्यातील विविध शाळा व त्यामधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व प्रदर्शन पार पाडल्याबद्दल प्रदर्शन उद्घाटन व समारोप समारंभास उपस्थित राहून मार्गदर्शन केलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे, सहभागी शाळा, शिक्षक वृंद, पंचायत समिती सर्व अधिकारी, विद्यार्थी, पालक व पत्रकार बंधू  यांचे  कौतुक करत आभार मानले.
       प्रारंभी प्राचार्या सुजाता गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.  प्रास्तविकात प्रशाळेत संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाविषयी सविस्तर माहिती दिली.
विज्ञान प्रदर्शन समारोप व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ज्योत्स्ना पवार व सौ. शीतल पवार यांनी केले. माधुरी काटकर यांनी आभार मानले.

गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे –
माध्यमिक गट – प्रथम : सर्वेश शिंदे (मालोजीराजे शेती महाविद्यालय, फलटण), द्वितीय : ऋतुगंधा रणवरे (खुटे हायस्कूल, खुटे), तृतीय : विनायक खोमणे (पाचपांडव आश्रम शाळा, अलगुडेवाडी), उत्तेजनार्थ : कृणाल जाधव (मुधोजी हायस्कूल, फलटण).

प्राथमिक गट – प्रथम : सोहम भोईटे, ओम धुमाळ (न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, आदर्की बुद्रुक), द्वितीय : चैतन्य गुंजवटे, अधिराज वांभुरे, सार्थक सोनवलकर, सोहम नेवसे (प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी), तृ‍तीय : आयुष जाधव, वरुण चव्हाण, प्रणव खराडे (प्राथमिक शाळा, काळज), उत्तेजनार्थ : सई गायकवाड, ईश्वरी कंक (जिल्हा परिषद शाळा, तरडगाव). शिक्षक गट माध्यमिक विभाग – प्रथम : धनंजय दिनकर सस्ते (यशवंतराव चव्हाण हायस्कूल, फलटण), प्राथमिक विभाग – प्रथम : आशा यादव (साखरवाडी विद्यालय), उत्तेजनार्थ : शैला पिसाळ (विनर्स गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल, नाईकबोमवाडी), प्रयोगशाळा सहाय्यक/परिचर प्रथम : जयंत हनुमंत काळुखे (साखरवाडी विद्यालय) दिव्यांग विद्यार्थी प्रेम पवार, अनिकेत बापूराव, चैतन्य पवार (मूकबधीर विद्यालय, ठाकूरकी).

वक्तृत्व स्पर्धा मध्ये माध्यमिक गट – प्रथम : दैवत मारकड (न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, सुरवडी), द्वितीय : मेहरोज इंतेकाफ शेख (प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी), तृतीय : दूर्वा कदम (साखरवाडी विद्यालय).
प्राथमिक गट – प्रथम : श्रीनी तंगारे (यशवंतराव चव्हाण विद्यालय, फलटण), द्वितीय : वैभवी भोसले (साखरवाडी विद्यालय), तृतीय : सान्वी गावडे (प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, गुणवरे), उत्तेजनार्थ : संस्कृती धस (न्यू इंग्लिश स्कूल, पाडेगाव).

प्रश्नमंजूषा स्पर्धा माध्यमिक – प्रथम : वैष्णवी तावरे, श्रेया यादव, खुषी दोशी (कमला निमकर बालभवन, फलटण),
द्वितीय : विनंती जगदाळे, ज्ञानेश्वरी डोंबाळे, आर्यन बांदल (प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी),
तृतीय : श्रुती सरगर, दिशा काळे, अमृता ढोपरे (श्रीमानशेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय, धुळदेव).

प्राथमिक – प्रथम : आदिती पन्हाळे, वैभवी घोरपडे, निग्राह कच्छी (बीजे इंग्लिश मीडियम स्कूल, साखरवाडी), द्वितीय : समर्थ खटके, अधर्व खटके, अनुराज बलकुळे (प्राथमिक शाळा, खटकेवस्ती), तृतीय : प्रगती दडस, वैष्णवी जगदाळे, भास्कर अनासाने (श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर, फलटण) या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कृष्णदेव क्षीरसागर प्राचार्य, भारत चिल्ड्रन्स ॲकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज, वालचंदनगर) उपस्थित होते.

हे ही वाचा  संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘संविधान गुण गौरव परीक्षा’; सुजाताताई बनसोडे यांच्या पुढाकारातून तीन ठिकाणी भव्य सहभाग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!