सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

निरा नदीत सापडलेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ उलगडले; प्रेमाच्या आमिषाने माणचा तरुण फलटणला बोलावून संपवला!

On: February 28, 2026 8:30 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – दि. 17/02/2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास गोखळी ता. फलटण, जि. सातारा येथील निरा नदीच्या पात्रात एका अनोळखी पुरुषाचे प्रेत पाण्यावर तरंगताना ग्रामस्थांना आढळून आले होते. याप्रकरणी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
तपासादरम्यान मृताची ओळख अंकुश बापू नरबट (वय 22), रा. ढाकणी, ता. माण, जि. सातारा अशी पटली. माण तालुक्यातील रहिवासी असलेल्या युवकाचा मृतदेह फलटण तालुक्यातील निरा नदीत कसा आढळला? तसेच त्याच्या डोक्यावर असलेल्या जखमा कशा झाल्या? या बाबत पोलिसांना संशय निर्माण झाला.
गोपनीय माहिती व तांत्रिक तपासातून धक्कादायक बाब समोर आली. मृत अंकुश नरबट याने आरोपींच्या कुटुंबातील एका मुलीबाबत गैरप्रकार केल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपींनी प्रतिष्ठेच्या कारणास्तव त्याची उघड चर्चा न करता बदला घेण्याचा कट रचला.
त्यासाठी स्त्रीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम खाते तयार करून मृताला प्रेमाच्या आमिषाने फलटण येथे भेटण्यास बोलाविण्यात आले.
दि. 15/02/2026 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अंकुश नरबट फलटण येथे आल्यानंतर आरोपींपैकी एका महिलेनं त्याला तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी निर्जनस्थळी नेले. तेथे कटानुसार इतर चार आरोपी वेगवेगळ्या वाहनांनी दाखल झाले. त्यांनी अंकुश नरबट याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चारचाकी वाहनात टाकले व पिंप्रद (ता. फलटण) हद्दीतील दुसऱ्या निर्जनस्थळी नेले.
तेथे त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह गोखळी येथील निरा नदीच्या पात्रात टाकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गु. र. नं. 119/2026 अन्वये भा.न्या.सं. 2023 चे कलम 103(1), 140(1), 238, 61, 3(5) अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे:
आविष्कार ज्ञानेश्वर भगत
श्रद्धा आविष्कार भगत
ज्ञानेश्वर भरतराव भगत
अर्चना ज्ञानेश्वर भगत
(सर्व रा. पिंप्रद, ता. फलटण, जि. सातारा)
आरोपींनी थंड डोक्याने कट रचून हा गुन्हा केल्याने सुरुवातीला पोलिसांकडे कोणतेही ठोस धागेदोरे नव्हते. मात्र पोलिसांनी फलटण–दहिवडी मार्गावरील हॉटेल, दूध डेअरी व पेट्रोल पंप येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच आरोपी व मृताच्या मोबाईल क्रमांकाची तांत्रिक माहिती विश्लेषित करून मिळालेल्या तुटपुंज्या माहितीवरून पुराव्यांची साखळी जोडत गुन्ह्याचा उलगडा केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक ज्ञानदेव पवार व पथकातील पोलीस कर्मचारी नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सुर्यवंशी, हणमंत दडस यांनी सहभाग घेतला.

हे ही वाचा  चक्रीच्या चक्रातून मुक्त होईल का फलटण? नव्या पोलीस निरीक्षक अरविंद काळेंकडे सर्वांची नजर!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!