फलटण – फलटण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने शनिवार, दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, फलटण शहरात एकूण 48 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
तसेच रविवार, दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार असल्याने शहरात गर्दी होण्याची शक्यता आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने रविवार, 21 डिसेंबर 2025 रोजीचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे.
तरी फलटण शहर तसेच शहरालगतच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. निखिल जाधव यांनी केले आहे.
नगरपालिका निवडणूक निकालाच्या दिवशी फलटणचा आठवडी बाजार रद्द
By Team LBNN
On: December 16, 2025 9:50 AM
---Advertisement---











