फलटण – फलटण नगरपरिषद निवडणूक 2025 अंतर्गत प्रभाग क्रमांक 1-अ मधून माझी आई सौ. लक्ष्मी प्रमोद आवळे यांना प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. माझ्या गेल्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्यावर विश्वास ठेवत हा निर्णय घेतला होता. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमच्यावर विश्वास दाखवत शिवसेनेची उमेदवारी दिली, याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
या निवडणुकीत असंख्य नागरिकांनी प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून आम्हाला मोलाचे सहकार्य केले. आठ वर्षाच्या काळात सामाजिक कार्य करत असताना अनेक अडचणी आल्या, मात्र त्या सर्वांवर मात करत सामाजिक कार्य अविरतपणे सुरू ठेवले. परिसरातील विविध समस्यांवर वेळोवेळी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला.
याच कामाची पोचपावती म्हणून नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सौ. लक्ष्मी प्रमोद आवळे यांना 698 मते मिळाली. अवघ्या 191 मतांनी विजय जरी हुकला असला, तरी जनतेने आम्हाला विजयाच्या अगदी जवळ आणून ठेवले आहे.
जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास लक्षात घेता, आगामी काळातही त्यांच्या प्रश्नांसाठी आणि विकासासाठी काम करत राहू. जरी नगरपरिषदेच्या सभागृहात जाण्याची संधी मिळाली नसली, तरी संविधानिक मार्गाने सामाजिक कार्य सुरूच राहील. मतदारांनी दिलेल्या मतरूपी आशीर्वादाचा मी कायम ऋणी राहीन, असे मत मंगेश आवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
आठ वर्षांचा लढा वाया गेला नाही; जनतेने विजयाच्या जवळ आणून ठेवले – मंगेश आवळे
By Team LBNN
On: December 22, 2025 2:40 PM
---Advertisement---











