सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

मार्केटमध्ये केबी चे नवे उत्पादन ‘मायकोरिस’

On: January 3, 2026 8:26 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – भारतीय शेतीला शाश्वत, पर्यावरणपूरक आणि विज्ञानाधारित उपाय उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत के. बी. बायो ऑर्गेनिक्स प्रा. लि. यांनी आपले नवे उत्पादन ‘मायकोरिस’ (Mycorrhiza Bio-Fertilizer) बाजारात सादर केले आहे. ROC (Root Organ Culture) या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेले हे उत्पादन पिकांच्या मुळांच्या आरोग्यासोबतच एकूण उत्पादनक्षमतेत लक्षणीय वाढ घडवून आणण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.

के. बी. बायो ऑर्गेनिक्स ही कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून जैवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय शेतकऱ्यांना विश्वासार्ह, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शेती उपाय पुरवत आहे. त्याच परंपरेतून ‘मायकोरिस’ हे उत्पादन कंपनीच्या अत्याधुनिक हाय-टेक प्रयोगशाळेत अनुभवी शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विकसित करण्यात आले आहे. या अंतर्गत ‘मायकोरिस प्रीमियम’ आणि ‘मायकोरिस’ अशा दोन वेगवेगळ्या श्रेणीतील उत्पादने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांच्या गरजा, पिकांची अवस्था व जमिनीच्या प्रकारानुसार योग्य पर्याय निवडता यावा, या उद्देशाने या दोन्ही श्रेणी विकसित करण्यात आल्या असून त्या उच्च दर्जाच्या मायकोरायझा तंत्रज्ञानावर आधारित आहेत.



कंपनीचे मायकोरायझा उत्पादन युनिट हे पूर्णपणे ROC तंत्रज्ञानावर आधारित असून अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. या युनिटची दररोज ७,००० बॉटल्स उत्पादन क्षमता आहे. देशातील मोजक्याच कंपन्यांकडे अशी प्रगत सुविधा उपलब्ध असून, के. बी. बायो ऑर्गेनिक्स ही त्यातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते.

‘मायकोरिस’ हे पिकांसाठी तिहेरी कार्यपद्धतीचे (Triple Action) फायदे देणारे प्रभावी उत्पादन आहे. यामध्ये मुळांची मजबूत व खोल वाढ होणे, जमिनीतून पोषकद्रव्यांचे अधिक व कार्यक्षम शोषण तसेच पिकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती आणि ताण सहनशीलता वाढवणे, या प्रमुख बाबींचा समावेश आहे.

या उत्पादनाच्या लोकार्पणप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सचिन यादव यांनी सांगितले की, “मायकोरिसचे लोकार्पण हे २०२६ च्या सुरुवातीलाच नवकल्पना, संशोधन आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. शेतकऱ्यांना अधिक उत्पादनक्षम, टिकाऊ आणि निसर्गस्नेही शेतीकडे घेऊन जाणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.” यावेळी त्यांनी पुढे माहिती देताना सांगितले की, हे उत्पादन लवकरच भारतातील १३ राज्यांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ४ देशांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला कंपनीतील वरिष्ठ अधिकारी, संशोधक तसेच विविध विभागांतील सर्व टीम सदस्य उपस्थित होते.

‘मायकोरिस’ हे उत्पादन रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून पर्यावरणाचा नैसर्गिक समतोल राखण्यास मदत करणारे असून, सध्या विविध पिकांसाठी बाजारात उपलब्ध आहे. या उत्पादनामुळे भारतीय शेतीला आधुनिक जैवतंत्रज्ञानाचा भक्कम आधार मिळणार असून, शाश्वत व हरित शेतीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!