सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी फलटणमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू; मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात निर्बंध

On: October 31, 2026 6:38 PM
Follow Us:

   फलटण : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या सन २०२६ मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

फलटण तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी डॉ. अभिजित जाधव यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.

फलटण तालुक्यात रविवार, दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्रीमंत राणीसाहेब सौ. लक्ष्मीदेवी मालोजीराजे नाईक निंबाळकर नगरपरिषद शाळा क्रमांक ८, फलटण येथे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मतदान प्रक्रिया शांततेत, निर्भय व विनाअडथळा पार पडावी, यासाठी मतदान केंद्राच्या परिसरात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, पूर्वनियोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रम तसेच निवडणूक प्राधिकरणाने अधिकृत केलेले अधिकारी व कर्मचारी यांना यातून सूट देण्यात आली आहे.

मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात उमेदवारांचे बूथ उभारणे, बॅनर, पोस्टर, निवडणूक चिन्हे किंवा अन्य प्रचार साहित्य बाळगणे अथवा वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच १०० मीटर परिसरात मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, लाउडस्पीकरचा वापर, फोन करणे आणि दुकाने व अन्य आस्थापना सुरू ठेवण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

याशिवाय मतदान प्रतिनिधी व इतर प्रतिनिधींना मतदान केंद्रात मोबाईल वापरणे, छायाचित्रे काढणे किंवा चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होईल, अशी कोणतीही कृती करता येणार नाही.

मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात शस्त्रे बाळगणे, निवडणूक प्रचार करणे, मतदारांना धमकावणे, विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यासाठी दबाव आणणे किंवा मतदारांना मतदानापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

सदर आदेश शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजल्यापासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

हे ही वाचा  प्रभाग क्रमांक एकमधून नगरसेवक पदासाठी तब्बल 14 नामांकन अर्ज दाखल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!