सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

दिवाळीपूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; श्री दत्त इंडिया साखरवाडी साखर कारखान्याकडून १५ कोटी ७९ लाखांची ऊसबिले जमा!

On: October 31, 2026 8:46 AM
Follow Us:

   ११ हजार ७८५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे रक्कम वर्ग

साखरवाडी – शेतकरी हा साखर कारखानदारीचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत श्री दत्त इंडिया साखरवाडी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या बिलापोटी प्रतिटन २०० रुपये याप्रमाणे तब्बल १५ कोटी ७९ लाख ६७ हजार ५८९ रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे. गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी ११ हजार ७८५ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ही रक्कम वर्ग करण्यात आली.

शेतकरी हा साखर कारखानदारीचा महत्त्वाचा घटक असून, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत व्यवस्थापनाने ही रक्कम वर्ग केल्याचे कारखाना व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. संबंधित शेतकरी बांधवांनी आपल्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम तपासून घ्यावी व आवश्यकतेनुसार बँकेतून रक्कम काढून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

यावेळी कारखान्याचे प्रशासन अधिकारी अजितराव जगताप, फायनान्स जीएम अमोल शिंदे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेती अधिकारी रमेश बागणवर, दिगंबर माने, साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, पै. संतोष भोसले, सुहास गायकवाड, पोपट भोसले तसेच ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले उपस्थित होते.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यावर मोठी रक्कम जमा झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. कारखाना व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, यावर्षीच्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणावर गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवून कारखान्याने नियोजन केले आहे. त्यादृष्टीने कारखान्याची गाळप क्षमता वाढविणे, तोडणी व वाहतूक यंत्रणेचे नियोजन करणे यावर विशेष भर देण्यात आला आहे. प्रतिदिन दहा हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आले असून, यावर्षीचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. आतापर्यंत सुमारे ६० ते ७० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासोबतच गाळप क्षमता वाढवून हंगाम यशस्वी करण्याच्या दिशेने श्री दत्त इंडिया साखरवाडी साखर कारखान्याचे व्यवस्थापन प्रयत्नशील असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे.

हे ही वाचा  श्रीराम कारखाना सुरू करण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांची संघर्षाची हाक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!