सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

धामोरी येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

On: February 1, 2026 6:19 PM
Follow Us:
---Advertisement---

कोपरगाव – श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळ, गुरुदत्त ग्रामीण बिगरशेती पतसंस्था धामोरी व धामापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी, धामोरी यांच्या संयुक्त विद्यमाने धामोरी येथील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार व सन्मान सोहळा गुरुदत्त पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पा. मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला.
हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, धामोरी येथे संपन्न झाला. अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या कर्जवाटप समितीवर श्री. आनंदराव वाघ, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्री. विलासराव भाकरे तसेच पुजारी सदस्य म्हणून पत्रकार श्री. निवृत्ती शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. मनोजराव जगझाप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. श्री संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळाच्या वतीने संस्थापक ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली सोनवणे, चेअरमन ह.भ.प. कचरू आण्णा वाणी, व्हा. चेअरमन ह.भ.प. भाऊसाहेब नाजगड, कार्याध्यक्ष ह.भ.प. राजेंद्र आरगडे, उपकार्याध्यक्ष श्री. शरदराव वाणी, सचिव ह.भ.प. राजेंद्र बारे, खजिनदार श्री. बाळासाहेब वाघ व ज्येष्ठ सदस्य ह.भ.प. बाबासाहेब वाणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी भजनी मंडळाचे माजी चेअरमन हरिभाऊ दरेकर, पोपटराव जेजुरकर, भाऊसाहेब टिळे, संतोष शेठ बागुल, रावसाहेब जगताप, धामापूर सोसायटीचे चेअरमन श्री. बाळासाहेब भाकरे, गुरुदत्त पतसंस्थेचे व्हा. चेअरमन श्री. दत्तात्रय वाघ, धामोरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भास्करआबा मांजरे, पंडितराव जाधव, स्वाध्याय परिवाराचे श्री. शरदभाऊ वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी सूचना ह.भ.प. बाबासाहेब वाणी यांनी मांडली तर अनुमोदन श्री. रावसाहेब जगताप यांनी दिले. प्रास्ताविक ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली सोनवणे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात श्री. ज्ञानदेव पाटील मांजरे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. रावसाहेब जगताप यांनी मानले.

हे ही वाचा  श्रीमंत रामराजे आज घेणार मोठा राजकीय निर्णय; कोणता झेंडा घेणार हाती?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!