फलटण – प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक आठ मधील नवनिर्वाचित नगरसेवक – नगरसेविका यांचा सत्कार समारंभ या प्रभागातील मित्र परिवाराच्या वतीने येथील हॉटेल आर्यमान मध्ये करण्यात आला होता.
कार्यक्रमांमध्ये नगरसेवक पप्पूभाई शेख, नगरसेविका सौ. रुपाली सूरज जाधव, नगरसेवक विशाल तेली, नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा, नगरसेविका कु. श्वेता किशोर ताराळकर यांना ‘सन्मानपत्र’ देण्यात आले.
यावेळी सचिन कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हे सांगितले की, “प्रभागातील दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांचा करण्यात आलेला सत्कार समारंभ हा कौतुकास्पद आहे. नगरसेवकांनी प्रभागातील काम करत असताना लोकशाहीच्या मूल्याचे पालन करून कायम नागरिकांच्या हिताची भूमिका घ्यावी.”
“तीर्थक्षेत्र फलटण शहराच्या सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी विद्यमान नगरसेवकांची आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा, चांगले रस्ते शुद्ध पाणी मिळाले पाहिजे. भावी पिढी सुदृढ, सुसंस्कृत व प्रगत होण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात आणि स्पर्धा परीक्षेत उज्वल यश मिळवण्यासाठी दर्जेदार सुविधा पालिकेच्या माध्यमातून शहरात उपलब्ध शहरात उपलब्ध कराव्यात” अशी अपेक्षा उद्योजक सत्यजित घोरपडे यांनी व्यक्त केली.
संग्राम खानविलकर, सत्यजित घोरपडे, ज्ञानेश्वर दळवी, नंदकुमार मांढरे, सुरेश निंबाळकर यांनी नगरसेवकांचे स्वागत केले.
नितीन तराळकर, वैभव विष्णूप्रद, किशोर भिंगरे, एडवोकेट राहुल सतुटे, मितेश खराडे यांनी नगरसेवकांना वृक्ष भेट देऊन फलटण शहर हे “हरित शहर” बनविण्याचा मानस व्यक्त केला.
मंगेश निंबाळकर अभिजीत निंबाळकर सुमित गाडे योगेश रशीद शेख किशोर देशपांडे सचिन चोरमले अविनाश पवार विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते नगरसेवकांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले. तर प्रास्ताविक अमृत पवार यांनी आणि आभार नंदकुमार मांढरे यांनी मानले.
सत्कार समारंभासाठी अनुप शहा, किशोर ताराळकर, सिकंदर डांगे, अनिल तेली, योगेश शिंदे, आकाश सोनवलकर, दीपक कर्वे, अमोल राऊत, रणजीत हिंगे, ओंकार हिंगे, अभिजीत पलसे, सौरभ तेली, महेश दळवे आणि प्रभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.












