सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

पत्नीच्या प्रसुतीसाठी रजेवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू
स्ट्रेचरवरून ओली बाळंतीण पत्नीनं दिला पतीला अखेरचा निरोप; साताऱ्यावर शोककळा

On: January 11, 2026 7:26 PM
Follow Us:
---Advertisement---

सातारा : पत्नीच्या प्रसुतीसाठी रजेवर आलेल्या सातारा तालुक्यातील आरेदरे गावचे जवान प्रमोद परशराम जाधव यांचा दुचाकी आणि पिकअप गाडीच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेवर कार्यरत असलेले बरड (ता. फलटण) येथील जवान विकास विठ्ठलराव गावडे यांना दक्षिण सुदानमध्ये वीरमरण आलं आहे. या दोन्ही दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
आरेदरे गावचे जवान प्रमोद जाधव यांचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता. त्यांच्या गरोदर पत्नीला प्रसुतीसाठी साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे ते आठ दिवसांच्या रजेवर गावी आले होते. शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास वाढे फाट्याकडून साताऱ्याकडे येत असताना जुन्या आरटीओ कार्यालय चौकात त्यांच्या दुचाकीला पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात रस्त्यावर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघाताच्या काही तासांनंतर शनिवारी सकाळी त्यांच्या पत्नीची प्रसुती झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, आपल्या लेकीला पाहण्यासाठी वडील या जगात नव्हते, ही बाब सर्वांनाच हळहळ लावणारी ठरली. या हृदयद्रावक घटनेमुळे आरेदरे गावात शोकसागर उसळला.
वैद्यकीय सोपस्कारानंतर शनिवारी दुपारी आरेदरे गावातील स्मशानभूमीत जवान प्रमोद जाधव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अखेरचा निरोप देण्यासाठी स्ट्रेचरवरून ओली बाळंतीण पत्नी व नवजात मुलीला आणण्यात आलं होतं. पत्नीच्या आक्रोशाने उपस्थितांचे काळीज पिळवटून गेलं. गावकऱ्यांनी आपल्या सुपुत्राला जड अंतःकरणाने अखेरचा निरोप दिला.
दरम्यान, बरड (ता. फलटण) येथील जवान विकास विठ्ठलराव गावडे यांना संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेदरम्यान दक्षिण सुदानमध्ये वीरमरण आलं असून, त्यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

हे ही वाचा  आई-वडिलांच्या साक्षीने महात साहेबांचा सन्माननीय निरोप; मुख्याधिकाऱ्यांनी खुर्चीवर बसवून दिला विशेष आदर सन्मान!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!