सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

कातरखटाव गटात अभयसिंह जगताप यांच्या प्रचाराचा झंझावात!
गावा-गावात राष्ट्रवादी काँग्रेस श.प. पक्षाच्या उमेदवारांचे जोरदार स्वागत!!

On: January 25, 2026 1:56 PM
Follow Us:
---Advertisement---

कातरखटाव  प्रतिनिधी – माण– खटाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख नेते श्री. अभयसिंह जगताप हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, कातरखटाव जिल्हा परिषद गटातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रचाराला वेग आला आहे. प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी कातरखटाव गटात लोकभेटी, दौरे तसेच कोपरा सभांची आघाडी घेतली आहे.
काल कातरखटाव गटातील पळसगाव येथे त्यांची कोपरा सभा पार पडली. यावेळी कातरखटाव गटातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी,विष्णुदास निकम, कालिदास घाडगे, आनंदराव फडतरे,सरपंच रवींद्र पवार,सरपंच शंकर फडतरे,माजी सरपंच राजाराम फडतरे, ज्ञानदेव घाडगे,शकील मुजावर, जनार्दन मोहिते, अजितकुमार आदीसह कातरखटाव गणाच्या उमेदवार सौ. आरती अर्जुन दुबळे तसेच दरुज गणाचे उमेदवार अॅड. राहुल निकम उपस्थित होते. पळसगाव ग्रामस्थांनी अभयसिंह जगताप, सौ. आरती दुबळे व अॅड. राहुल निकम यांचे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केले.
यावेळी बोलताना अभयसिंह जगताप म्हणाले की, “मी प्रथमच कोणत्यातरी निवडणुकीला सामोरे जात आहे. गेली अनेक वर्षे राजकारणातून सामाजिक कार्य करत असून, जिल्हा परिषद सदस्य म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मला द्यावी.”
तसेच कातरखटाव गणातून सर्वसामान्य कुटुंबातील, शिक्षित व कामाची जिद्द असलेल्या सौ. आरती दुबळे यांना पक्षाने संधी दिली असून, त्यांना देखील निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
दरुज गणातून वकिली क्षेत्रात कार्यरत असलेले उच्चशिक्षित अॅड. राहुल निकम यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला असून, दरुज गणातील मतदारांनी त्यांना भरभरून पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
कातरखटाव गटात अभयसिंह जगताप यांनी प्रचाराला घेतलेली जोरदार आघाडी पाहता विरोधकांचे धाबे दणाणल्याची चर्चा सध्या संपूर्ण गटात रंगू लागली आहे.

हे ही वाचा  साताऱ्यात 30 ऑक्टोबर रोजी शाहू कला मंदिरात फोक प्रबोधनाचे कार्यक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!