सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

चक्रीवर कारवाई करण्यात फलटण पोलीस अपयशी!! सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी लक्ष घालणार का?

On: November 7, 2025 2:16 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण : फलटण शहरातील सुरू असलेल्या चक्रीच्या चालक आणि मालकांना पोलीसांची भीती राहिली नसल्याचे स्पष्ट दिसत असून, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी या प्रकरणी स्वतः लक्ष घालण्याची गरज आहे.अनेक दिवसांपासून सुरू असलेला चक्रीचा खुलेआम बाजार काही केल्या थांबण्यास तयार नसून, फलटणमधील चक्रीबाबत सर्व माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांना मिळत असतानाही कारवाई का होत नाही, हे अद्याप उलगडलेले नाही.शहरात सध्या जवळपास आठ ठिकाणी चक्रीचा धंदा खुलेआम सुरू असून, शहरातील अनेक तरुण या व्यसनात लाखो रुपयांना फसले आहेत. माध्यमांनी वारंवार आवाज उठवूनही पोलीस व वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे.

“कुणाचाही बाप आमची चक्री बंद करू शकत नाही” अशी वल्गना चक्री चालक करत असल्याची माहिती मिळत आहे , त्यांनी थेट पोलीस खात्यालाच खुलेआम आव्हान दिले आहे. गेली दोन वर्षे फलटण शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.अलीकडेच पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांची बदली होऊन फलटण शहर पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली. शहरवासीयांना अपेक्षा होती की त्यांच्या कार्यकाळात अवैध धंदे बंद होतील. मात्र, चक्रीच्या धंद्यावर मात्र कोणताही परिणाम झालेला नाही.आज संपूर्ण सातारा जिल्ह्यात “फलटण म्हणजे चक्रीचे माहेरघर” अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता प्रश्न उभा राहिला आहे – जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी तरी या चक्रीच्या खुलेआम धंद्यावर अंकुश लावणार का?

हे ही वाचा  प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून अमानुष खून; लाकूड कापायच्या मशीनने मृतदेहाचे केले तुकडे|फलटण तालुका हादरला

शहरातील चक्री चालक, मालक आणि ऑनलाइन आयडी धारकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे. चक्रीचे चालक कोण, त्यांचे मालक कोण, आयडी कोणी दिला, आर्थिक व्यवहारात कोण किती कमिशन घेतं, मिळालेला पैसा कुठे गुंतवला जातो, याचा सर्वंकष तपास होणे अत्यंत गरजेचे आहे.आज या अवैध व्यवसायातून कोट्यवधीची माया गोळा करणाऱ्या चक्री सम्राटांवर “महाराष्ट्र धोकादायक क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा, 1981 (एम.पी.डी.ए.)” अंतर्गत कारवाई करण्याची मागणी होत आहे. जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी आता काय पाऊल उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

निरा नदीत सापडलेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ उलगडले; प्रेमाच्या आमिषाने माणचा तरुण फलटणला बोलावून संपवला!

अवैध धंद्यांना पाठबळ? फलटणची अब्रू टांगणीला!
तरुण तडफदार डीवायएसपी असतानाही कारवाईत डगमग का?

अवैध धंद्यांना खतपाणी त्यामुळेच पीआय काळे आणि डीवायएसपी खांबे यांच्या कार्यकाळात चिरकूट गुंडांची दहशत वाढली!!

फलटण हनी ट्रॅप प्रकरण |आरोपी अटक आणि २९ लाखांहून अधिक रक्कम, गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल जप्त

फलटणच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावर नगरपालिकेची कारवाई; अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?

प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून अमानुष खून; लाकूड कापायच्या मशीनने मृतदेहाचे केले तुकडे|फलटण तालुका हादरला

error: Content is protected !!