सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

राजे गटाच्या कार्यकर्त्यांकडून स्पष्ट संकेत राष्ट्रवादी पुन्हा!!

On: November 13, 2025 10:00 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर गेल्या दोन दिवसांपासून मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान  महत्त्वाच्या राजकीय घडामोडी फलटणच्या राजकारणात घडल्या आहेत.

शहरातील सोमवार पेठ आणि मंगळवार पेठ भागात ज्यांना रामराजेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाते, त्या कार्यकर्त्यांनीच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेत आमदार सचिन पाटील यांच्याकडून प्रवेश करून घेतला आहे . याच पार्श्वभूमीवर श्रीमंत रामराजे यांनी मुंबईतून “गेमच पलटी” करण्याचा डाव आखल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

श्रीमंत रामराजे नक्की कोणत्या नेत्यांना भेटले याबाबत अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नसली, तरी राजे गटातील कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या संकेतानुसार, ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय होण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.राजे गटाच्या कार्यकर्त्यांकडून नगराध्यक्ष पदाचे दावेदार असलेले श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत असलेला एक जुना फोटो व्हायरल करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींवरून आतापर्यंत राजे गट सोडून गेलेले काही कार्यकर्ते पुन्हा राजेगटाकडे वळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे फलटण नगरपालिकेच्या राजकारणात आगामी काळात नेमका “गेम चेंज” कोणाचा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा  आत्मविश्‍वासू, लक्षवेधक व कल्पक नेतृत्त्व : मा.श्री.दिलीपसिंह भोसले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!