सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या जीवनावर आधारित ‘फकिरीयत’ चित्रपटाचा फलटणमध्ये शानदार शुभारंभ

On: December 2, 2025 12:46 PM
Follow Us:
---Advertisement---

माँ गुरुमाई यांना ‘क्रियायोग भूषण’ पुरस्कार प्रदान

फलटण – माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या जीवनावर आधारित ‘फकिरीयत’ चित्रपटाचा भव्य उद्‌घाटन समारंभ फलटण येथे उत्साहात पार पडला. क्रियायोग मिशन फाउंडेशनच्या संस्थापिका असलेल्या माँ गुरुमाई यांच्या हस्ते चित्रपटाचे औपचारिक उद्‌घाटन झाले. फलटण येथील साधकांच्या वतीने दि. 1 डिसेंबर 2025 रोजी माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांना ‘क्रियायोग भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

या उद्‌घाटन सोहळ्यात फलटण तर्फे डॉ. गुळवणी सर व मॅडम, डॉ. माधव पोळ, डॉ. अलका पोळ, डॉ. प्रसाद जोशी, डॉ. किरणकुमार नाळे, डॉ. राजश्री नाळे, ला. मंगेश दोशी, ला. पूजा दोशी, श्री. कैलास साळुंके, श्री. राकेश हेंद्रे, श्री. बाबाजी काळे, डॉ. सुजित अडसूळ (बारामती), ऍड. योगेश वाघ (बारामती) तसेच सर्व पत्रकारांमध्ये गुरुमाई यांचे स्वागत-सत्कार करण्यात आले.

सिटी प्राईड फलटण येथे झालेल्या विशेष शोमध्ये, ज्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे त्या माँ गुरुमाई स्वतः उपस्थित होत्या आणि त्यांनी सर्व प्रेक्षकांसमवेत हा चित्रपट पाहिला. चित्रपटानंतर सर्व साडेचारशे प्रेक्षकांना त्यांनी कृपाशीर्वाद व दर्शन दिले. चित्रपटगृहाची क्षमता 380 असताना तब्बल 460 प्रेक्षकांनी हजेरी लावल्याने अतिरिक्त खुर्च्या लावण्याची गरज भासली.

यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माँ गुरुमाई यांनी दीड तास सर्वांना मार्गदर्शन केले. अध्यात्म म्हणजे काय? क्रियायोग काय आहे? ध्यान, तंत्र, पाखंड याची खरी व्याख्या काय? या विषयांवर त्यांनी अत्यंत सुंदर विवेचन केले. विशेषतः तरुणांनी तरुणपणीच आध्यात्मिक मार्गावर यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

गेल्या दहा वर्षांपासून क्रियायोग या प्राचीन योगिक पद्धतीच्या बॅचेस त्या संपूर्ण महाराष्ट्रात तसेच काशी येथे घेत आहेत. प्राणायाम, मुद्रा, ध्यान यांचे संयोजन आणि प्राचीन आध्यात्मिक ज्ञान म्हणजे ‘क्रियायोग’, असे त्यांनी स्पष्ट केले.

उत्तराखंडमधील द्वारहाट कुकुचिना येथील गुफा आश्रम संकुल आणि रुद्रधाम, नाशिक यांची त्या संस्थापिका आहेत.
क्रियायोग मिशन फाउंडेशनचे ध्येय जगभरातील ध्यान व क्रियायोग शिकू इच्छिणाऱ्या साधकांसाठी एक समकालीन अध्यात्मिक जागा निर्माण करणे असे आहे.

क्रियायोगच्या प्रशिक्षणामध्ये बेसिक व अॅडव्हान्स दीक्षा, कर्मक्षालन यज्ञ, ब्रह्मखोज शिबिर, हिमालयीन साधना आदी अभ्यासक्रम घेतले जातात. ही सर्व शिबिरे नाममात्र शुल्कात आयोजित करण्यात येतात.

हे ही वाचा  साताऱ्यात 30 ऑक्टोबर रोजी शाहू कला मंदिरात फोक प्रबोधनाचे कार्यक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!