सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

आई-वडिलांच्या साक्षीने महात साहेबांचा सन्माननीय निरोप; मुख्याधिकाऱ्यांनी खुर्चीवर बसवून दिला विशेष आदर सन्मान!!

On: February 28, 2026 12:19 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण : फलटण नगरपरिषदेचे कर्मचारी तथा उपमुख्याधिकारी म्हणून प्रदीर्घ काळ कारभार सांभाळणारे मुश्ताकअहमद अब्दुललतिफ महात (महात साहेब) काल शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त नगरपरिषदेत भावपूर्ण सत्कार सोहळा पार पडला.

यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी महात साहेबांना स्वतःच्या खुर्चीवर बसवून विशेष सन्मान केला. लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनीही त्यांचा यथोचित गौरव करत नगरपालिकेतील अनेक जुने प्रसंग आणि त्यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला.

महात साहेबांच्या सेवाजिवनातील एक हृदयस्पर्शी वैशिष्ट्य म्हणजे.ज्या आई-वडिलांच्या समोर त्यांनी शासकीय सेवेत रुजू होताना पाऊल ठेवले, त्याच आई-वडिलांच्या उपस्थितीत त्यांनी निवृत्तीचा सत्कार स्वीकारला. या क्षणी महात साहेब व त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. कार्यक्रमाला त्यांची नातवंडेही उपस्थित होती, त्यामुळे वातावरण अधिकच भावुक झाले.

नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात साहेबांचा विशेष सत्कार केला. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या संयमी, कर्तव्यदक्ष आणि सर्वसमावेशक कार्यशैलीचे कौतुक केले. अनेक वर्षे प्रशासनाचा कारभार सुरळीतपणे सांभाळताना त्यांनी दाखवलेली कार्यतत्परता व समन्वयक वृत्ती यांचा विशेष उल्लेख करण्यात आला.

महात साहेबांच्या निवृत्तीने नगरपरिषदेतील एक अनुभवी आणि समर्पित अधिकारी कार्यमुक्त झाला असला, तरी त्यांच्या कार्याची आठवण आणि प्रशासनातील योगदान दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

हे ही वाचा  फलटणचे वीर सुपुत्र जवान विकास गावडे शहीदउद्या बरड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!