सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आ. सचिन पाटील व आ. श्रीमंत रामराजे यांच्या शुभहस्ते

On: December 2, 2025 3:33 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. सचिन पाटील आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या शुभहस्ते ५३व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २:०० वाजता प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी (फलटण) येथे संपन्न होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा चे कुलगुरू मा. प्रा. डॉ. ज्ञानदेव म्हस्के, तसेच फलटणचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी उपस्थित राहणार आहेत.

सन्माननीय उपस्थितीमध्ये सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. श्री. धनंजय चोपडे, फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. सतीश कुंभार, तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे जेष्ठ अधिव्याख्याता मा. डॉ. सतीश फरांदे यांचा समावेश आहे. सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी श्री. मठपती यांनी केले आहे.

फलटण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ५३वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ४ ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. फलटण तालुक्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन फलटण पंचायत समिती शिक्षण विभागाने केले आहे. या सर्व कार्यक्रमाची माहिती सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कोळकी फलटणच्या संचालिका सौ संध्या गायकवाड यांनी दिली आहे.

हे ही वाचा  संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘संविधान गुण गौरव परीक्षा’; सुजाताताई बनसोडे यांच्या पुढाकारातून तीन ठिकाणी भव्य सहभाग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!