मुंबई – राज्यातील काही तांत्रिक अडचणीमुळे फलटणसह काही नगरपालिकांची निवडणूक 20 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. मात्र महाराष्ट्रातील उर्वरित बहुतांश नगरपालिका व नगरपंचायतींचे मतदान आज, दि. 2 डिसेंबर रोजी पार पडत आहे.
साधारणपणे उद्या मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार होते. परंतु फलटणमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन “महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींचे निकाल एकाच दिवशी जाहीर करावेत” अशी मागणी केली होती.
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती असून नागपूर खंडपीठाने सर्वच नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
रामराजेंची मागणी मान्य; राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींचे निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार!!
By Team LBNN
On: December 2, 2025 12:02 PM
---Advertisement---











