सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

महाशिवरात्री निमित्त माळजाई मंदिर येथील महादेव मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आयोजन

On: February 13, 2026 8:28 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण, दि. १३ फेब्रुवारी : फलटण शहरात यंदाही महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात येणार असून विविध मंदिरांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. शहरातील प्रमुख महादेव मंदिरांनी भाविकांसाठी विशेष आयोजन जाहीर केले आहे.

प्रतिवर्षीप्रमाणे माळजाई मंदिर येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शिवभक्तांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माळजाई मंदिर व उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांनी केले आहे.

तसेच श्री जबरेश्वर मंदिर येथे सकाळी अभिषेक व महापूजेचे आयोजन करण्यात आले असून सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार पेठेतील ऐतिहासिक श्री माणकेश्वर महादेव मंदिर येथे मुख्य उत्सव रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी संपन्न होणार आहे. पहाटे ५ ते ७ या वेळेत ‘लघुरुद्र महाअभिषेक’ होणार आहे. दुपारी ४ ते ५:३० या वेळेत दादामहाराज महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम, सायंकाळी ७:३० वाजता महाआरती, त्यानंतर ‘शिवरुद्र ढोल ताशा ध्वज पथक’ यांचे वादन आणि रात्री ९:३० वाजता एकतारी भजनाने दिवसाची सांगता होणार आहे. सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० नंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासोबतच श्री नागेश्वर मंदिर तसेच शहरातील इतर महादेव मंदिरांमध्येही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

फलटण शहर व परिसरातील सर्व शिवभक्तांनी या मंगल सोहळ्यात सहभागी होऊन दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. महाशिवरात्री निमित्त संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!