सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय ‘संविधान गुण गौरव परीक्षा’; सुजाताताई बनसोडे यांच्या पुढाकारातून तीन ठिकाणी भव्य सहभाग

On: December 9, 2025 2:12 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे- संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान गुण गौरव समिती तर्फे २६ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय ‘संविधान गुण गौरव परीक्षा’ आयोजित करण्यात आली. सुजाताताई बनसोडे यांच्या पुढाकारातून पिंपरी चिंचवड, तुकाराम नगर आणि फलटण या तीन ठिकाणी हा उपक्रम भव्य प्रमाणात पार पडला.
     पिंपरी चिंचवड मनपा शाळा, नेहरूनगर येथील तब्बल २७५ विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. याशिवाय संत तुकाराम नगर येथील पंचशील बुद्ध विहार परिसरातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होत उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला. फलटणमधील मधोजी हायस्कूलमध्ये देखील सुजाताताईंच्या प्रयत्नातून परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून येथेही विद्यार्थी व नागरिकांचा दणदणीत सहभाग दिसून आला.
    “संविधान हे भाषणातून नव्हे, तर वाचनातून समजून घेण्याचा विषय आहे,” या उद्देशाने राज्यस्तरीय परीक्षेचे आयोजन करण्यात आले असल्याचे या उपक्रमाचे मुख्य आयोजक नुरखॉं पठाण यांनी सांगितले. संविधान जनजागृती वाढावी, संविधान अभ्यासाची आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमध्ये संविधान मूल्यांची रुजवणूक व्हावी, यासाठी सुजाताताई बनसोडे यांनी सातत्याने प्रयत्न करत तीनही केंद्रांवर उपक्रम यशस्वीपणे राबवला.
    सदर उपक्रमात गरजू विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे म्हणून सुजाताताई व संजय बनसोडे यांनी विविध संविधान ज्ञानदात्यांना आवाहन केले. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत राहुल खोब्रागडे सर, इम्रान सिकंदर सय्यद, विकास सर, कदम मावशी, पोपट भालेराव, बाबा त्रिभुवन, राजू कांबळे, अंजली काकडे, सविता झुंजारराव, दशरथ दातार यांसह अनेक मान्यवरांनी धाव घेतली.
    यात विशेष ठरला तो सुजाताईंचा मुलगा सुजित. त्याने आपल्या बचत केलेल्या खाऊच्या पैशातून २५ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या परीक्षेची फी भरली आणि एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
     फलटण येथील उद्घाटन प्रसंगी ॲड. संदीप कांबळे, इम्रान सय्यद, मुख्याध्यापक मोरे सर, रजिया शेख, राजू आढाव, रवी कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. पिंपरी चिंचवड मनपा शाळा, नेहरूनगर येथे उद्घाटनावेळी संजय बनसोडे, खोब्रागडे सर, आशा कांबळे, मंदा जोगदंड, जाधव मॅडम आदींच्या उपस्थितीत उपक्रमाला सुरुवात झाली. पंचशील बुद्ध विहार, तुकाराम नगर येथे रमेश झेंडे, विजय गायकवाड, विशाल कांबळे आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.
    शिक्षक बंधू-भगिनींनी केंद्रप्रमुख, संयोजक व स्वयंसेवक म्हणून जबाबदाऱ्या स्वीकारत परीक्षेला मोठे यश मिळवून दिले. सर्वांच्या एकत्रित सहकार्यामुळे हा उपक्रम तीनही ठिकाणी अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.

हे ही वाचा  शिक्षणासोबत संस्कारांचा वारसा : प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंटमध्ये प्रज्ञा योग शिबीर उत्साहात संपन्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!