सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

अवैध धंद्यांना पाठबळ? फलटणची अब्रू टांगणीला!
तरुण तडफदार डीवायएसपी असतानाही कारवाईत डगमग का?

On: February 24, 2026 9:57 AM
Follow Us:
---Advertisement---

फलटण : शहरासह संपूर्ण तालुक्यात अवैध धंद्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये आणि प्रमुख मार्गांवर खुलेआमपणे अवैध व्यवसाय सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. इतक्या उघडपणे हे धंदे सुरू असताना प्रशासन अनभिज्ञ आहे का, की मौनपाठबळ आहे? अशी चर्चा सध्या फलटणमध्ये रंगू लागली आहे.
काही नागरिकांनी संताप व्यक्त करत सांगितले की, अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना देऊनही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याला नेमके जबाबदार कोण? उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे की फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे?
तरुण, तडफदार डीवायएसपी असतानाही विशाल खांबे यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांवर अपेक्षित कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे, पोलीस निरीक्षक काळे यांचाही कायद्याचा धाक शहरात दिसून येत नसल्याची चर्चा आहे.
परिणामी, शहरात किरकोळ गुंडांची संख्या वाढत असून कायद्याचा धाक कमी झाल्याचे नागरिकांचे मत आहे. खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचा आरोपही होत आहे.
फलटण शहरातील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर ठोस आणि दृश्यमान कारवाई करणार का?

हे ही वाचा  फलटणच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावर नगरपालिकेची कारवाई; अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

निरा नदीत सापडलेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ उलगडले; प्रेमाच्या आमिषाने माणचा तरुण फलटणला बोलावून संपवला!

अवैध धंद्यांना खतपाणी त्यामुळेच पीआय काळे आणि डीवायएसपी खांबे यांच्या कार्यकाळात चिरकूट गुंडांची दहशत वाढली!!

फलटण हनी ट्रॅप प्रकरण |आरोपी अटक आणि २९ लाखांहून अधिक रक्कम, गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल जप्त

फलटणच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावर नगरपालिकेची कारवाई; अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?

प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून अमानुष खून; लाकूड कापायच्या मशीनने मृतदेहाचे केले तुकडे|फलटण तालुका हादरला

अपघाताचा बनाव उघड करुन सस्तेवाडीतील खुनाला वाचा फोडण्यात फलटण ग्रामीण पोलीसांना यश !

error: Content is protected !!