फलटण : फलटण शहरातील सोमवार पेठ येथील रहिवासी कालकथित बापूराव लक्ष्मण खरात यांचे रविवार, दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी रात्री 11.37 वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवार, 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.30 वाजता बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
उद्या मंगळवार, 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.30 वाजता फलटण स्मशानभूमी येथे अस्थिपूजन होणार असून, दुपारी 12 वाजता त्यांच्या राहत्या घरी पुण्यानुमोदन बौद्ध पूजा आयोजित करण्यात आली आहे.
कालकथित बापूराव खरात यांनी प्रामाणिक कष्टांच्या जोरावर आपल्या तीन मुलगे व एका मुलीला उत्तम शिक्षण दिले. त्यांचा मोठा मुलगा योगेश खरात हे महाराष्ट्र पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून मुंबई येथे सेवा बजावत आहेत. तर नयन खरात व चिराग खरात यांनी कष्ट व जिद्दीच्या जोरावर जियानी उद्योग समूह – पोल्ट्री व एग्ज सप्लायर्स या व्यवसायाला नावारूपास आणले आहे. मुलगी विवाहित असून त्यांच्या पश्चात पत्नी, तीन सुना व जावई नातवंडांसह मोठा परिवार आहे.
कालकथित बापूराव लक्ष्मण खरात यांचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ व प्रेमळ होता. सर्वांशी आपुलकीने वागणारे, कोणाशीही वादविवाद न करता शांत व प्रामाणिक जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे खरात कुटुंबावर शोककळा पसरली असून, नातेवाईक, मित्रपरिवार व सोमवार पेठ परिसरातील नागरिकांनी कुटुंबियांचे सांत्वन केले आहे.
कालकथितांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ लाभो, ही बुद्ध चरणी प्रार्थना.






