सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

स्थायी व विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड; सत्तासमीकरणे स्पष्ट

On: February 26, 2026 5:40 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण : फलटण नगरपरिषद येथे स्थायी समिती व विविध विषय समित्यांचे सभापती गठित करण्यासाठी गुरुवारी आयोजित विशेष सर्वसाधारण सभा राजकीयदृष्ट्या अत्यंत लक्षवेधी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अपक्ष नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टी (खासदार गट) यांना दिलेल्या खुल्या पाठिंब्यामुळे सर्व समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.
या घडामोडींमुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील खासदार गटाचे पालिकेवरील वर्चस्व अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही सभा पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी निखील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर प्रमुख उपस्थित होते.
विषय समित्यांचे नवे सभापती
पालिकेच्या महत्त्वाच्या विषय समित्यांवर पुढीलप्रमाणे निवडी जाहीर झाल्या :
सार्वजनिक बांधकाम समिती : सोमाशेठ जाधव
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती : प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले (पदसिद्ध)
स्वच्छता, वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती : सचिन अहिवळे
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती : राहुल निंबाळकर
नियोजन व विकास समिती : संदिप चोरमले
महिला व बालकल्याण समिती : सभापती – मोहिनी मंगेश हेंद्रे, उपसभापती – कांचन दत्तराज व्हटकर
मागासवर्गीय दुर्बल घटक कल्याणकारी समिती : सुपर्णा सनी अहिवळे
स्थायी समितीत कोण?
पालिकेची सर्वाधिक अधिकार असलेली स्थायी समिती नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राहील. सर्व विषय समित्यांचे सभापती हे पदसिद्ध सदस्य असतील.
सभागृहातून भाजप गटनेते रोहित नागटिळे, नगरसेवक अशोकराव जाधव आणि राजे गटाचे गटनेते पांडुरंग गुंजवटे (आबा) यांची सदस्य म्हणून निवड झाली.
सभेतील दोन लक्षवेधी घडामोडी
१) ज्येष्ठत्वाला मान
सभेदरम्यान विरोधी गटनेते पांडुरंग गुंजवटे हे मागील रांगेत बसले होते. नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांना पुढील रांगेत बसण्याची विनंती केली. या प्रसंगामुळे सभागृहात सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले.
२) अनुपस्थितीची चर्चा
उपनगराध्यक्षा प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले आणि राजे गटाचे स्वीकृत नगरसेवक अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर हे सभेला अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हे ही वाचा  फलटण नगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशीही शून्य अर्ज - मुख्याधिकारी निखिल जाधव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!