फलटण – नीरा उजवा कालवा पाणी सोडण्याबाबत फलटण पूर्व भागातील शेतकरी मागील आठ दिवसांपासून वारंवार पाठपुरावा करत होते. नीरा उजवा कालव्याच्या अस्थरीकरणाचे काम सुरू असल्याने काही दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता.
शेतकऱ्यांच्या अडचणीची दखल घेत आमदार सचिन पाटील यांनी तात्काळ हस्तक्षेप करत नीरा उजवा कालवा विभागाचे अभियंता श्री. मोरे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. या चर्चेनंतर तातडीने पाणी पुरवठा सुरू करण्याचे निर्देश आमदारांनी संबंधित विभागाला दिले.
त्यानुसार, नीरा उजवा कालव्याचा पाणी पुरवठा उद्या दिनांक ०६ डिसेंबर २०२५ रोजी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अभियंता श्री. मोरे यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत होणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नीरा उजव्या कालव्याचे पाणी उद्या सुटणार : आमदार सचिन पाटील
By Team LBNN
On: December 5, 2025 1:30 PM
---Advertisement---











