सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

आळंदी–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील निंभोरे उडान पुलावर झेंड्यांचा अतिरेक; उत्साहात सुरक्षिततेकडे दुर्लक्ष?

On: April 27, 2026 4:30 PM
Follow Us:

जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात झेंडे लावले; दुचाकीस्वारांसाठी संभाव्य धोका वाढला
फलटण – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी आळंदी–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर फलटण तालुक्यातील निंभोरे गावाजवळील उडान पुलावर जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात झेंडे लावण्यात आले आहेत. या सजावटीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
हायवेवरील वेगवान वाहतुकीदरम्यान वाऱ्यामुळे झेंडे हलत असल्याने चालकांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्याने वाहनांचा वेग अधिक असतो. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा प्रकार अधिक धोकादायक ठरू शकतो. काही वेळा झेंड्याचे कापड अचानक वाऱ्याच्या वेगामुळे झेंड्याच्या काठी मधून निसटून चेहऱ्यावर आल्यास वाहनावरील नियंत्रण सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी उत्साहात सजावट केली असली तरी, राष्ट्रीय महामार्गावरील नियमांचे पालन आणि सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!