सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता

On: July 16, 2026 8:41 AM
Follow Us:

    भारतीय शेती झपाट्याने बदलत आहे. वाढते उत्पादन, बदलते हवामान, रासायनिक अवशेषांबाबत वाढती जागरूकता आणि निर्यातीस कठोर होत जाणारे कमाल अवशेष मर्यादा (एम.आर.एल.) निकष यामुळे सुरक्षित आणि शाश्वत पीकसंरक्षणाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवू लागली आहे. अशा काळात भारतीय संशोधनावर आधारित के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या वनस्पतीजन्य (Botanical) पीकसंरक्षण तंत्रज्ञानाला भारत सरकारच्या केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIB & RC) कडून मिळालेली मान्यता ही भारतीय कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड ठरत आहे.

संशोधनातून साकारलेलं पीकसंरक्षण तंत्रज्ञान

के.बी. बायो ऑरगॅनिक्सचे संचालक मा. श्री. सचिन यादव यांच्या नेतृत्वाखाली २०१८ मध्ये एका छोट्याशा संशोधन केंद्रातून वनस्पतीजन्य पीकसंरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रवास सुरू झाला. कंपनीच्या संशोधन व विकास (R&D) विभागाने अनेक वर्षे सातत्याने काम करत वैज्ञानिकदृष्ट्या प्रभावी तंत्रज्ञान विकसित केले.

या संशोधनासाठी ७५ हून अधिक संशोधकांनी तीन वर्षे सातत्याने काम केले. हजारो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रांचा अभ्यास, जैव कार्यक्षमता, विषारी परिणाम, पर्यावरणीय सुरक्षितता तसेच बरेच दस्तऐवजीकरण पूर्ण करण्यात आले. भारतातील विविध कृषी विद्यापीठांमध्ये वेगवेगळ्या हवामान आणि हंगामात चाचण्या घेऊन या तंत्रज्ञानाची वैज्ञानिक पडताळणी करण्यात आली. या सर्व प्रक्रियेनंतरच केंद्रीय कीटकनाशक मंडळाकडून अधिकृत नोंदणी प्राप्त झाली.

दोन वनस्पतीजन्य फॉर्म्युलेशन्सला सेक्शन 9(3) अंतर्गत मान्यता

या नोंदणीअंतर्गत फंगो रेझ (थायमॉल आधारित वनस्पतीजन्य बुरशीनाशक) आणि थ्रिप्स रेझ (पायपरीन + थायमॉल आधारित वनस्पतीजन्य कीटकनाशक) या दोन फॉर्म्युलेशन्सना अधिकृत मान्यता आणि पेटंट मिळाले आहे.

विशेष म्हणजे ही दोन्ही उत्पादने ४८ तासांत प्रभाव दाखवतात. तसेच त्यांचा पीक काढणी कालावधी (PHI) शून्य असल्याने काढणीपूर्वी फवारणी करूनही निर्यातीसाठी आवश्यक निकष पूर्ण करण्यास मदत होते. एम.आर.एल. निकषांच्या पार्श्वभूमीवर ही बाब निर्यातक्षम पिकांसाठी विशेष महत्त्वाची मानली जात आहे.

निर्यात आणि जागतिक बाजारपेठेला चालना

सध्या के.बी. बायो ऑरगॅनिक्स भारतातील ११ राज्यांमध्ये कार्यरत असून केनिया आणि दक्षिण अमेरिका यांसह तब्बल ३२ देशांमध्ये निर्यात करत आहे. कंपनीच्या या नोंदणीमुळे भारतीय वनस्पतीजन्य तंत्रज्ञानाला जागतिक बाजारपेठेत अधिक संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

आजपर्यंत सक्रिय घटकांसाठी भारताला मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र के.बी. बायो ऑरगॅनिक्सला या नवीन तंत्रज्ञानाला मिळालेल्या मान्यतेमुळे शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय पद्धतीने शेती करून निर्यातीसाठी दर्जेदार उत्पादन घेणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात अधिक चांगला दर मिळवणे आता अधिक सोपे झाले आहे.

विशेषतः युरोपीय, अमेरिकन आणि आफ्रिकन देशांमध्ये सेंद्रिय शेतीसाठी प्रभावी वनस्पतीजन्य पीकसंरक्षण उत्पादनांची मागणी वाढत आहे. यामुळे भारतीय तंत्रज्ञानाला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळण्यासोबतच निर्यातीतही वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

द्राक्षे, डाळिंब, भात, चहा, मसाले यांसारख्या निर्यातक्षम पिकांसाठी कमाल औषध मर्यादा (एम.आर.एल.) निकष पाळणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अमेरिका, युरोप, अरब देशांमध्ये कीटकनाशकांच्या अवशेषांमुळे भारतीय मिरची, तांदूळ आणि इतर कृषी उत्पादनांच्या काही निर्यात कंटेनर्सना नकार देण्यात आल्याची उदाहरणे सातत्याने समोर येत आहेत. या औषधांमुळे होणारे नुकसान भारताला टाळता येणार आहे.

रासायनिक अवशेषांचे वाढते महत्त्व देशांतर्गत बाजारपेठेतही दिसून येत आहे. मागील वर्षी मध्य प्रदेश शासनाने मंजूर नसलेल्या रासायनिक अवशेषांचे प्रमाण आढळलेल्या सोयाबीन पिकाची खरेदी न करण्याचा निर्णय घेतला होता. यावरून भविष्यात सुरक्षित व मान्यताप्राप्त पीकसंरक्षण उपायांचा स्वीकार करणे ही केवळ निर्यातीची नव्हे, तर देशांतर्गत बाजारपेठेचीही गरज ठरणार असल्याचे स्पष्ट होते. कारण भारत सरकारही त्यादृष्टीने पावले उचलत आहे.

येत्या काळात जैविक पीकसंरक्षण उत्पादनांची जागतिक मागणी वाढण्याची शक्यता असून, या क्षेत्रात के.बी. बायो ऑरगॅनिक्स आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार २०५० पर्यंत कर्करोगाच्या रुग्णसंख्येत सुमारे ६६ टक्के वाढ, तर मधुमेहाच्या रुग्णसंख्येत जवळपास दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षित अन्न आणि रासायनिक अवशेष कमी असलेल्या शेतीपद्धतीचे महत्त्व अधिक वाढत आहे.

एकंदरीतच अन्नसुरक्षिततेत व उत्पादनात या परवानगीमुळे मदत होणार आहे. यामुळे भारतात सेंद्रिय शेतीचे एक नवीन पर्व सुरू होईल यात शंका नाही.

के.बी. बायो ऑरगॅनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. सचिन यादव म्हणाले, “ही मान्यता म्हणजे भारतीय संशोधनाचा, शाश्वत शेतीचा आणि देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या विश्वासाचा सन्मान आहे. २०५० पर्यंत ‘प्रत्येक ताटात सेंद्रिय अन्न’ हे ध्येय पूर्ण करण्यासाठी संशोधन आणि नवकल्पनांचा प्रवास यापुढेही सुरू राहील.”

के.बी. बायो ऑरगॅनिक्सला मिळालेली ही केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIB & RC) मान्यता वनस्पतीजन्य पीकसंरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. ही मान्यता केवळ उत्पादनांची नोंदणी नसून भारतीय संशोधन, स्वदेशी तंत्रज्ञान आणि शाश्वत शेतीला मिळालेले बळ मानले जात आहे.

हे ही वाचा  महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; कमर्शियल LPG सिलेंडर महाग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!