सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणच्या अंतर्गत रस्त्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर; रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पाठपुराव्याला यश

On: July 15, 2026 6:33 PM
Follow Us:

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मंजुरी; आमदार सचिन पाटील यांच्यासह दिल्लीत बैठक • शहरातील प्रमुख रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार

दिल्ली – फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटणचे आमदार सचिन पाटील यांनी बुधवारी दि. १५ नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत निवेदन सादर केले. त्यानंतर या निधीला मंजुरी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

बैठकीत फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था, वाढती वाहतूक आणि दर्जेदार रस्त्यांची गरज याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.

या निधीमुळे फलटण शहरातील प्रमुख अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार असून शहरातील वाहतुकीला दिलासा मिळणार आहे.

यापूर्वीही फलटण शहरातून जाणाऱ्या पालखी महामार्गासाठी सुमारे ७५ कोटी रुपये तसेच ‘मिसिंग लिंक’ मार्गासाठी ९७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नव्या ७० कोटी रुपयांच्या निधीमुळे शहरातील रस्ते विकासाच्या कामांना आणखी गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्याने फलटण शहर व तालुक्याच्या विकासासाठी भविष्यातही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा  गौरी-गणपती उत्सवापूर्वी फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; फलटण तालुका काँग्रेसची मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडे निवेदनातून मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

फलटणमध्ये ७ सप्टेंबरला जनता दरबार; नागरिकांनी तक्रारी २५ ऑगस्टपर्यंत जमा करण्याचे आवाहन

गौरी-गणपती उत्सवापूर्वी फलटण शहरातील प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; फलटण तालुका काँग्रेसची मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्याकडे निवेदनातून मागणी

मुख्याधिकारी निखिल जाधव यांचा धडक निर्णय; चायनीज मांजा विक्री आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द, घरातून विक्री करणाऱ्यांवरही कडक कायदेशीर कारवाई होणार !

फलटणमध्ये चायना मांजामुळे माजी सैनिकाचा गळा कापला; पतंगप्रेमी चायना मांजा वापरणार की टाळणार?

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत उद्या फलटणमध्ये वॉर्ड सभा

क्रांतिसिंह नाना पाटील गृहरचना संस्थेच्या सदस्यांना आवास योजनेचा लाभ देण्याची मागणी; परिसराला “क्रांतिसिंह नाना पाटील नगर” नाव देण्याचाही आग्रह

error: Content is protected !!