बारामती : स्वर्गीय अजितदादा पवार यांनी नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देत ग्रामीण भागातील खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. त्याच धर्तीवर क्रिकेटसाठी बारामतीकरांचे सहकार्य कायमस्वरूपी राहील, असा विश्वास बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत अंडर-१९ गटात खेळणारा बारामतीचा युवा क्रिकेटपटू अथर्व जाधव याने रुई येथे ए. जे. स्पोर्ट्स अरेना उभारले आहे. क्रिकेट व फुटबॉल खेळांसाठी तयार करण्यात आलेल्या या क्रीडांगणाचा शुभारंभ नगराध्यक्ष सचिन सातव यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी नगरसेवक प्रवीण माने, गौरव पारसे, विष्णुपंत चौधरी, अमर धुमाळ, नगरसेविका व उपनगराध्यक्ष संपदा चौधरी, सरपंच मच्छिंद्र चौधरी, युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, राघू शेठ चौधरी, नवनाथ चौधरी, प्रा. अजिनाथ चौधरी, धनंजय जामदार, शरद सूर्यवंशी, लक्ष्मण मोरे, राजेंद्र खराडे, हरीश कुंभारकर, भारत मोकाशी, संभाजीराव माने, भीमराव भोसले, साईनाथ चौधरी आणि एच. आर. एस. प्रोसेसिंग सिस्टीमचे व्हाइस प्रेसिडेंट जितेंद्र जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील खेळाडू, कामगार, विविध कंपन्यांतील कर्मचारी, महिला आणि फिटनेस क्लासेसमधील सदस्यांना त्यांच्या सोयीनुसार विविध वेळांमध्ये क्रिकेट व फुटबॉल खेळता यावेत, या उद्देशाने हे मैदान विकसित करण्यात आले आहे. या मैदानाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १२,५०० चौरस फूट असून, मैदानाची उंची ३६ फूट आणि तापमान ३६० डिग्रीमध्ये नियंत्रित ठेवण्याची सुविधा असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच प्रेक्षक गॅलरी, स्वच्छतागृह आणि कॅन्टीन यांसारख्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या सुविधांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना दर्जेदार वातावरणात सराव आणि खेळाचा आनंद घेता येणार आहे. अल्पावधीतच उच्च दर्जाच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव मिळेल, असा विश्वास युवा क्रिकेटपटू अथर्व जाधव यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सावळेपाटील यांनी केले, तर आभार साईनाथ चौधरी यांनी मानले.
स्वर्गीय अजितदादांचा क्रीडाविषयक दृष्टिकोन पुढे नेणार; ग्रामीण खेळाडूंना सुविधा देण्यावर नगराध्यक्ष सचिन सातव यांचा भर
By Team LBNN
On: October 29, 2026 2:19 PM







