सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

बारामतीकरांसाठी आनंदाची बातमी! ‘Yumma!’ फूड डिलिव्हरी ॲपचे शहरात आगमन

On: July 18, 2026 10:09 AM
Follow Us:

बारामती : अत्यंत कमी डिलिव्हरी चार्ज, आकर्षक ऑफर्स आणि जलद सेवेमुळे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले ‘Yumma!’ (यम्मा) फूड डिलिव्हरी ॲप आता बारामती शहरात सुरू झाले आहे. या निमित्ताने बारामतीतील ग्राहकांसाठी ‘Free Delivery Days’ या विशेष ऑफरचीही घोषणा करण्यात आली असून, १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पात्र ऑर्डर्सवर मोफत डिलिव्हरीचा लाभ मिळणार आहे.

Yumma! च्या आगमनामुळे बारामतीतील नागरिकांना शहरातील नामांकित रेस्टॉरंट्समधील विविध खाद्यपदार्थ घरबसल्या काही क्लिकमध्ये मागविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. वापरण्यास सोपे मोबाईल ॲप, जलद ऑर्डर प्रक्रिया, सुरक्षित ऑनलाइन पेमेंट आणि वेळेवर डिलिव्हरी यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक सोयीस्कर होणार आहे.

ग्राहकांसोबतच स्थानिक रेस्टॉरंट व्यवसायासाठीही Yumma! हे प्रभावी डिजिटल व्यासपीठ ठरणार आहे. ॲपच्या माध्यमातून रेस्टॉरंट्सना अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या व्यवसायाच्या वाढीस चालना मिळेल. याशिवाय डिलिव्हरी पार्टनर म्हणून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

हे ही वाचा  फलटण शहरात फुड डिलिव्हरीसाठी डिलिव्हरी पार्टनर पाहिजेत !

कंपनीकडून सुरू करण्यात आलेल्या ‘Free Delivery Days’ अंतर्गत पात्र ऑर्डर्सवर ग्राहकांना डिलिव्हरी शुल्कातून सवलत दिली जाणार असून, ही विशेष ऑफर १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत वैध राहणार आहे. त्यामुळे बारामतीतील ग्राहकांना कमी खर्चात आणि अधिक सोयीस्कर पद्धतीने आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

बारामतीतील नागरिकांनी आजच गुगल प्ले स्टोअर वरून “Yumma! Food Delivery” हे ॲप डाउनलोड करून या विशेष ऑफर्सचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!