वडूज – कातरखटाव पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. आरती अर्जुन दुबळे यांनी भाजपच्या उमेदवाराविरोधात अत्यंत कडवी आणि लक्षवेधी लढत दिली. मतमोजणीच्या सुरुवातीला सौ. आरती दुबळे यांनी आघाडी घेतली होती. अखेर संपूर्ण कातरखटाव गणातून त्यांनी ५,४४० मतांचे भक्कम जनमत आपल्या पारड्यात टाकले. मात्र, अल्पशा मतांच्या फरकाने त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
पराभव झाला असला तरी सौ. आरती दुबळे यांनी आपल्या पारड्यात मत टाकणाऱ्या सर्व मतदारांचे जाहीर आभार मानले आहेत.
दरम्यान, मान–खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते श्री. अभयसिंह जगताप यांनी कातरखटाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवून तब्बल १२,०५९ इतके मोठे जनमत मिळवले. मात्र, त्यांनाही अल्पशा मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. वरकुटे मलवडी येथील मूळ रहिवासी असलेल्या अभयसिंह जगताप यांनी कातरखटाव गटातून मिळवलेले हे जनमत प्रतिस्पर्धी पक्षालाही विचार करायला भाग पाडणारे ठरले आहे.
याच गटातील दरूज गणातून पक्षाचे उमेदवार राहुल निकम यांनीही ५,१०६ मते मिळवत जोरदार लढत दिली. अभयसिंह जगताप यांच्या नेतृत्वाखाली त्यांनीही प्रभावी प्रचार करत मतदारांचा विश्वास संपादन केला.
एकूणच, भाजपचे विजयी उमेदवार असले तरी कातरखटाव गट व गणात अभयसिंह जगताप, सौ. आरती दुबळे आणि राहुल निकम यांच्या लढतीचीच अधिक चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे.
अभयसिंह जगताप यांच्या नेतृत्वाखाली कातरखटाव गणात आरती दुबळेंची कडवी झुंज!!
By Team LBNN
On: February 10, 2026 12:50 PM
---Advertisement---











