सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

प्रोग्रेसिव्ह स्कूलमध्ये 4 डिसेंबर पासून फलटण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन

On: November 25, 2025 7:41 PM
Follow Us:

फलटण – फलटण पंचायत समिती शिक्षण विभाग आणि सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ५३वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन ४ ते ६ डिसेंबर २०२५ दरम्यान प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कोळकी (फलटण) येथे आयोजित करण्यात आले आहे. फलटण तालुक्यातील सर्व माध्यम आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी या विज्ञान प्रदर्शनात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले असून विद्यार्थी, शिक्षक व परिचर यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे सांगितले आहे. या प्रदर्शनासाठी शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन व प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उदयोन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडेलिंग, आरोग्य आणि स्वच्छता तसेच जल संवर्धन व व्यवस्थापन हे प्रमुख विषय निश्चित करण्यात आले आहेत. इयत्ता ६ वी ते ८ वी (उच्च प्राथमिक) आणि ९ वी ते १२ वी (माध्यमिक व उच्च माध्यमिक) विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके, मॉडेल्स व वैज्ञानिक प्रकल्प अपेक्षित असून ‘तंत्रज्ञान आणि खेळण्यांमधील नवकल्पना’ या श्रेणीतही स्वतंत्र मॉडेल्स सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळांसाठी एक आणि प्रत्येक माध्यमिक शाळेस दोन उपकरणांची मांडणी अनिवार्य असून सर्व विद्यार्थ्यांनी आपली मॉडेल्स वेळेत सादर करावीत असेही कळविण्यात आले आहे.

विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन, नोंदणी व मॉडेल मांडणी ४ डिसेंबरला होणार असून ५ डिसेंबर रोजी प्रश्नमंजुषा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतील तर ६ डिसेंबर रोजी पारितोषिक वितरण व समारोप होणार आहे. फलटण तालुक्यातील नवोदित वैज्ञानिक प्रतिभेला दिशा देणारे हे प्रदर्शन उत्साहात पार पडणार असून विविध शाळांकडून मोठ्या प्रमाणात सहभाग अपेक्षित असल्याचे फलटण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. मठपती साहेब यांनी सांगितले.

हे ही वाचा  घराबाहेरील विद्युत प्रवाह ठरला जीवघेणा; काही क्षणांत शिंदे कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!