सभासदांच्या विश्वासामुळे संस्थेची यशस्वी वाटचाल; ७० कोटींच्या ठेवी, ५५ कोटींचे कर्जवाटप
फलटण : सभासदांचा दृढ विश्वास, संचालक मंडळाचे सक्षम व दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन आणि अधिकारीवर्गाच्या सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर गॅलेक्सी प्लस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, फलटणने आर्थिक प्रगतीची यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. संस्थेच्या या प्रगतीचा लाभ सभासदांपर्यंत पोहोचविताना चालू आर्थिक वर्षासाठी सभासदांना १० टक्के लाभांश (डिव्हिडंड) वाटप करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही संस्थेला ऑडिटमध्ये ‘अ’ वर्ग प्राप्त झाला आहे.
संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. सचिन यादव यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती देताना सांगितले की, संस्थेच्या एकूण ५ शाखा कार्यरत असून संस्थेने ७० कोटी रुपयांच्या ठेवी संकलित केल्या आहेत. तसेच सभासदांच्या विविध आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ५५ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून संस्थेचा एकत्रित व्यवसाय १२५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
सभासदांना अधिक गतिमान व सुलभ सेवा देण्यासाठी संस्थेकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. संस्थेमध्ये गोल्ड टेस्टिंग मशीन, मोबाईल बँकिंग आणि डिजिटल पिग्मी यांसारख्या आधुनिक सुविधांचा वापर केला जात असून, बदलत्या काळाची गरज ओळखून या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे चेअरमन श्री. सचिन यादव यांनी सांगितले.
संस्थेने पुणे जिल्हा कार्यक्षेत्र आत्मसात करून शाखाविस्तार केला असून, नवीन तालुका कार्यक्षेत्र असणारी गॅलेक्सी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, बारामती येथे अद्ययावत शाखा स्थापन केली आहे. तसेच गॅलेक्सी मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या प्रयत्नातून केंद्र सरकारकडून परवानगी मिळवून फलटण शहरात अद्ययावत शाखा सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, गॅलेक्सी ग्रुप ऑफ संस्थांच्या ठेवी सुमारे १०० कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे माजी संचालक श्री. गणेश निकम यांनी नमूद केले. लोकांचा वाढता प्रतिसाद आणि संस्थेच्या कामकाजामुळे महाराष्ट्र व कर्नाटकात संस्था विश्वासार्हता निर्माण करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सभासदांना १०% लाभांश जाहीर – चेअरमन श्री. सचिन यादव
By Team LBNN
On: September 20, 2026 8:17 PM










