सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी; श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

On: August 13, 2026 10:32 PM
Follow Us:

फलटण : शिक्षणमहर्षी, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित तसेच बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे ४ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

या दुःखद प्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कोल्हापूर येथे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि डॉ. संजय पाटील यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले.

डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत उमटला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांना सक्षम करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय मानले जाते.

दूरदृष्टी, कर्तृत्व आणि समाजाभिमुख दृष्टिकोन असलेले व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याने मोठी हानी झाली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या सांत्वनपर भेटीप्रसंगी डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, हेमंत रानडे, प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा  धाडसी कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक योगेश बापुराव खरात यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

“युवा महोत्सवातून तणावमुक्ती व सर्जनशीलतेला शास्त्रीय अधिष्ठान”— प्रा. डॉ.श्रीमती ज्योती जाधव

फलटण येथे ६ ऑक्टोबरला दहावे ‘नांदी साहित्य संमेलन’; ग्रंथ प्रदर्शनासाठी साहित्यकृती पाठवण्याचे आवाहन

गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सभासदांना १०% लाभांश जाहीर – चेअरमन श्री. सचिन यादव

श्रीराम कारखाना बंद पाडण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करतायत; राजू शेट्टींचा गंभीर आरोप

आमदार सचिन पाटील यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध; महेंद्र सूर्यवंशी – बेडके  यांची टीका

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

error: Content is protected !!