सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?’, रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा

On: November 7, 2025 2:16 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येवरुन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप झाले. यानंतर काल फलटण येथे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जाहीर सभ घेतली. या सभेत त्यांनी काही पुरावे दाखवत यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर राजकारण करत असल्याचा आरोप केला. यावेळी महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला. दरम्यान, यावरुन आता रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला.

आज रामराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. ‘उद्यापासून आचारसंहिता लागेल. काही गोष्टी बोलता येणार नाहीत. त्यामुळे आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत. मागची ३० वर्ष आम्ही काम केले. देवेंद्र फडणवीस यांच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे, असे मी याआधीही बोललो आहे. त्यांनी आरोप केला की, हे रामराजे यांनी केले. त्यांनी माझे टोपण नाव मास्टर माईंड ठेवले. देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, ती रद्द व्हावी, असे सांगितले. या संदर्भात माझा काहीही संबंध नाही’, रामराजे नाईक निंबाळकर यांनी असे स्पष्ट केले.

हे ही वाचा  फलटण |प्रभाग क्र. 1 मधून सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्या मातोश्री सौ. लक्ष्मी प्रमोद आवळे निवडणुकीच्या रिंगणात!

“ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या झाली त्याचा मास्टरमाईंड मीच आहे का? पोलिसांना जे सांगितले त्याचा ही मास्टरमाईंड मीच आहे का? त्यांनी माझ्यावर अब्रू नुकसान दावा लावावा. मुलीच्या आत्महत्या प्रकरणी सखोल तपास करावा”,अशी मागणी रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.

दुधाचा अभिषेक देवाला घालतात

गोरे प्रकरणात माझे फोन झाले म्हणून माझी पोलिसांनी चार तास चौकशी झाली होती. २०२२ साली मला गुंतवण्याचा प्रयत्न केला मी कधी तक्रार केली का? २०१९ ला अजित पवार यांच्यावर पाणी चोरल्याचा आरोप केला. त्यांचा आमदार कशावर उभा राहिला? ननावरे केस झाली त्याला मी सांगितले का त्याचा मास्टरमाईंड मीच आहे का? दुधाचा अभिषेक केला हा इव्हेंट नाहीतर काय आहे. अभिषेक कोणाला घालतात देवाला, हा काय देव आहे का?, असा निशाणा निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर साधला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

अभयसिंह जगताप यांचा पुन्हा एकदा सुसंस्कृतपणा भावला; पराभवानंतरही निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आभार मेळावा

नगराध्यक्ष समशेरशिंह ना निंबाळकर यांचा प्रजासत्ताक दिनी फलटणच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प!

राष्ट्रवादीचे चेतन शिंदे फलटण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या राजे गटासोबत?

फलटण प्रभाग क्रमांक चार व आठ मधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा जाहीर सत्कार

सौ.पायल अमोल पवार यांची सांगवी पंचायत समिती गणातून उमेदवारीची पक्षश्रेष्ठींकडे मागणी;महादेव कोळी समाजाला संधी द्या समाजाची आग्रही भूमिका

फलटणमधील कनकवंदना मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी भरती

error: Content is protected !!