सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

राष्ट्रवादीचे चेतन शिंदे फलटण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या राजे गटासोबत?

On: January 25, 2026 4:41 PM
Follow Us:

फलटण – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले फलटण पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री. चेतन सुभाषराव शिंदे हे फलटण पंचायत समिती व सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या निवडणुकीत ते राजे गटाला साथ देत शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  काम करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
चेतन शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फलटण तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. प्रतिभाताई शिंदे यांचे पती आहेत. यापूर्वी फलटण नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अपेक्षित न्याय मिळाला नसल्याची नाराजी प्रतिभाताई शिंदे यांनी उघडपणे व्यक्त केली होती.
फलटण तालुक्यात एकूण आठ जिल्हा परिषद गट असून त्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला केवळ दोन गट देण्यात आले आहेत. तसेच १६ पंचायत समिती गणांपैकी फक्त चार गण मिळाल्याने शिंदे गटामध्ये असंतोष असल्याचे बोलले जात आहे. पक्षाकडून आपल्याला व आपल्या गटाला विश्वासात घेतले गेले नाही, अशी भावना चेतन शिंदे यांच्या भूमिकेतून स्पष्टपणे दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर, होत असलेल्या फलटण पंचायत समिती व सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत चेतन शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस मधेच राहून वेगळी भूमिका घेत शिवसेनेला साथ देत राजे गटासोबत जुळवाजुळव करणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

हे ही वाचा  नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी चेतन शिंदेंकडून समशेरसिंह यांची घोड्यावरून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक!!

( चेतन शिंदे यांची वेगळी भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यामुळे बातमीमध्ये संग्रहित फोटो वापरण्यात आला आहे )

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!