सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सह्याद्री भैया कदम यांच्या प्रवेशाने फलटण तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली – मंत्री मकरंद आबा पाटील

On: January 7, 2026 10:49 PM
Follow Us:
---Advertisement---

सातारा | प्रतिनिधी
फलटण तालुक्यातील युवा नेतृत्व तसेच माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांचे सुपुत्र श्री. सह्याद्री चिमणराव कदम यांनी आज सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक व राजकीय ताकद अधिक भक्कम होणार असल्याचा विश्वास महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद आबा पाटील यांनी व्यक्त केला.
या प्रवेशानिमित्त सह्याद्री कदम यांनी फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून, मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह गाड्यांचा ताफा साताऱ्याच्या दिशेने रवाना केला. सातारा येथे आयोजित कार्यक्रमात मंत्री मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या घटनेमुळे स्व. चिमणराव कदम यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रवेशानंतर बोलताना मंत्री मकरंद पाटील म्हणाले, “सह्याद्री भैया कदम यांच्या प्रवेशामुळे फलटण तालुक्यात आमची ताकद नक्कीच वाढली असून, आगामी काळात या भागात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूतपणे कार्य करेल.”
यावेळी सह्याद्री कदम यांनी सांगितले की, “समाजसेवा, विकासाभिमुख राजकारण आणि युवकांना संधी देणारी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका पाहता आपण पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी कटिबद्ध राहू.”
या कार्यक्रमास मंत्री मकरंद पाटील यांच्यासह  बाळासाहेब सोळस्कर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, सौ. प्रतिभाताई शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सह्याद्री कदम यांचे शेकडो समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा  फलटण नगरपालिकेत मोठा राजकीय घडामोडींचा थरार; महायुतीचा झेंडा की नवा समीकरणबदल?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!