सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी चेतन शिंदेंकडून समशेरसिंह यांची घोड्यावरून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक!!

On: December 31, 2025 11:38 AM
Follow Us:
---Advertisement---

फलटण -फलटण नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांच्या गटाला घवघवीत यश मिळाले. या निवडणुकीत यांच्या भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकत्रित  १८ नगरसेवक निवडून आले असून नगराध्यक्ष पदासाठी श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सुमारे ६०० मतांचे मताधिक्य मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे.
समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना नगराध्यक्ष बनवण्यात अनेकांनी योगदान दिले असले, तरी उमेदवारी निश्चित होण्यापूर्वीपासून खांद्याला खांदा लावून जनसामान्यांशी थेट संपर्क साधण्याचे काम ज्यांनी सातत्याने केले, ते म्हणजे ज्येष्ठ नेते स्वर्गीय सुभाषराव शिंदे यांचे पुत्र तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी फलटण तालुकाध्यक्ष सौ. प्रतिभाताई शिंदे यांचे पती चेतन शिंदे होत.
“समशेर दादांनाच नगराध्यक्ष करायचे” या ठाम निर्धाराने चेतन शिंदे यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधी आणि नंतरही   वेळ देत प्रचारात सक्रिय भूमिका बजावली. ऐनवेळी नगराध्यक्ष पदाची तयारी करत असलेल्या श्री दिलीपसिंह भोसले यांना माघार घ्यावी लागली आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर हे उमेदवारी मिळवत झालेल्या दोन्ही नाईक निंबाळकर यांच्या लढतीमध्ये विजयी झाले. आणि या विजयानंतर आपल्या जिव्हाळ्याच्या मैत्रीचे आणि सहकार्याचे प्रतीक म्हणून नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्याच्या काही तास आधी चेतन शिंदे यांनी नूतन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची घोड्यावरून, ढोल-ताशांच्या गजरात नगरपालिकेच्या प्रवेशद्वारापर्यंत भव्य मिरवणूक काढत आगळ्या-वेगळ्या शुभेच्छा दिल्या.
या मिरवणुकीला राजकीय वारसा आणि भावनिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. चेतन शिंदे यांचे वडील, ज्येष्ठ नेते स्व. सुभाषराव शिंदे यांनी पूर्वी फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत ‘घोडा’ या चिन्हावरून निवडणूक लढवली होती. असे फलटण तालुक्यामध्ये म्हटले जाते. त्यामुळे समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची घोड्यावरून काढलेली मिरवणूक ही केवळ अभिनंदनापुरती मर्यादित न राहता, स्व. सुभाषराव शिंदे यांच्या राजकीय आठवणींना दिलेली प्रतीकात्मक मानवंदना असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या अनोख्या मिरवणुकीमुळे, चेतन शिंदे यांनी दाखवलेली निष्ठा, मैत्री आणि राजकीय परंपरेची जाण याबद्दल फलटण तालुक्यात त्यांची प्रशंसा होत आहे.

हे ही वाचा  सोमवार पेठेतील 53-54 या वादग्रस्त जागेतील रहिवाशांना श्रीमंत संजीवराजेंचा दिलासा!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!