सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

पत्रकारांनी समाजाभिमुख होण्यासाठी प्रयत्न करावेत : प्रा विकास शिंदे

On: January 19, 2026 8:53 AM
Follow Us:

फलटण – जेष्ठ पत्रकारांकडून आपण कायम मार्गदर्शन घेत राहिले पाहिजे. नव्याने पत्रकारितेत येताना तुमचा अभ्यास प्रगल्भ हवा आपल्या परिसराची ऐतिहासिक , सामाजिक , राजकीय व सांस्कृतिक जाण पत्रकारांना पाहिजे. समाजातील विविध प्रश्न मांडण्याची निर्भीडता आपल्यात येण्यासाठी पत्रकारांनी अधिकाधिक समाजाभिमुख असले पाहिजे. लेखणीतून बदल घडवण्याची ताकत दिसली पाहिजे.माणच्या भूमीत ज्या पद्धतीने सकस अन्नधान्य पिकतं त्याच पद्धतीने समाजासाठी पोषक साहित्य माण च्या भूमीने दिले आहे त्या मुळे माण मधून पत्रकारांनी आजवर खूप समाजाभिमुख लिखाण केले आहे. जेष्ठांचा आदर्श समोर ठेऊन पत्रकारांनी समाजाभिमुख लिखाण करावे असे मार्गदर्शन भारतीय पत्रकार संघाच्या पत्रकार दिनानिमित्त बिजवडी येथे लोकमतचे फलटण तालुका प्रतिनिधी व भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष प्रा विकास शिंदे यांनी केले
          यावेळी जेष्ठ पत्रकार बापूराव गुंजवटे , भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव , युवा कवी अविनाश चव्हाण , पंचायत समिती माण चे माजी सभापती बाळासाहेब रणपिसे , मामुशेठ विरकर, शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संजय भोसले, हनुमंत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांनी केले
         या कार्यक्रमात युवा कवी अविनाश चव्हाण यांनी पत्रकारितेतील उपेक्षित घाटकांना बळ दिले पाहिजे त्यातून चौथा स्तंभ अधिक मजबूत होईल असे सांगितले जेष्ठ पत्रकार बापूराव गुंजवटे यांनी  सध्याच्या पत्रकारिते मध्ये असणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पत्रकारांनी सज्ज असले पाहिजे पत्रकारितेतील चुकीच्या गोष्टींना वेळीच रोखले पाहिजे काही उमद्या तरुण पत्रकारांना चांगले मार्गदर्शन मिळाले पाहिजे असे प्रतिपादन केले

जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव यांनी भारतीय पत्रकार संघ हा पत्रकारांच्या हितासाठी सदैव तत्पर असून आपली पत्रकारिता राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी भारतीय पत्रकार संघात सामील व्हा असे आवाहन केले

यावेळी एम डी दडस , हृषीकेश भोसले , चारुशीला माने दादाराजे भोसले, महेंद्र भोसले, आत्माराम शिंगाडे, विक्रम जगताप माधुरी भोसले दादासाहेब भोसले, आकाश दडस, प्रशांत सोनवणे, जुबेर कोतवाल यांच्यासह बिजवडी व पंचक्रोशीतुन नागरिक व पत्रकार उपस्थित होते

हे ही वाचा  फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!