सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

कार्यकर्त्यांकडून भाजप उमेदवारांचे विजयी बॅनर व्हायरल; ईव्हीएमवर  संशय व्यक्त!!

On: February 8, 2026 9:29 PM
Follow Us:

सातारा – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल उद्या, मंगळवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार असताना, त्यापूर्वीच खटाव तालुक्यातील कातरखटाव गट व गणातून भाजपच्या उमेदवारांचे विजयी बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
व्हॉट्सअ‍ॅप व अन्य सोशल मीडिया माध्यमांवर हे बॅनर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वीच विजयी बॅनर कसे काय तयार झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
“जर निकालाच्या आधीच विजयी बॅनर सोशल मीडियावर झळकत असतील, तर मग निवडणुका घेण्याचा अर्थ काय?” असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त होत असून, प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

हे ही वाचा  ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २८ एप्रिलला मतदान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!