सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण हनी ट्रॅप प्रकरण |आरोपी अटक आणि २९ लाखांहून अधिक रक्कम, गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल जप्त

On: February 20, 2026 3:03 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – प्रेमसंबंधाचे आमिष दाखवून एका हॉटेल व्यावसायिकाला जाळ्यात ओढत त्याच्याकडून तब्बल ४० लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या साखळी टोळीचा पर्दाफाश करण्यात फलटण शहर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात एका महिला आरोपीसह इतर संशयितांना अटक करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही माहिती फलटण शहर पोलीस स्टेशन कडून देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व्यावसायिकास सोशल मीडियावर ‘Hi’ असा मेसेज पाठवून संवाद सुरू करण्यात आला. त्यानंतर मोबाईलवरून संपर्क वाढवत विश्वास संपादन करण्यात आला. काही दिवसांतच संबंधितांना फलटण येथे बोलावून हॉटेलमध्ये नेण्यात आले.

तेथे अश्लील बोलून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली आणि ४० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यापैकी काही रक्कम रोख तसेच एटीएम आणि इतर माध्यमांतून उकळल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

फिर्यादी पुण्याकडे परतत असताना रस्त्यात वाहन अडवून त्यांच्याकडील सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून घेण्यात आल्याची तक्रार आहे. या घटनेनंतर पीडित व्यक्तीने तात्काळ पोलिसांत धाव घेतली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष पथक तयार करून सापळा रचला. विविध ठिकाणी छापे टाकत आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून २९ लाखांहून अधिक रक्कम, गुन्ह्यात वापरलेली वाहने व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

या गुन्ह्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू असून इतर संभाव्य व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे. नागरिकांनी सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क ठेवताना दक्षता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

फलटण शहर पोलिसांच्या या कारवाईचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

हे ही वाचा  प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून अमानुष खून; लाकूड कापायच्या मशीनने मृतदेहाचे केले तुकडे|फलटण तालुका हादरला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

निरा नदीत सापडलेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ उलगडले; प्रेमाच्या आमिषाने माणचा तरुण फलटणला बोलावून संपवला!

अवैध धंद्यांना पाठबळ? फलटणची अब्रू टांगणीला!
तरुण तडफदार डीवायएसपी असतानाही कारवाईत डगमग का?

अवैध धंद्यांना खतपाणी त्यामुळेच पीआय काळे आणि डीवायएसपी खांबे यांच्या कार्यकाळात चिरकूट गुंडांची दहशत वाढली!!

फलटणच्या रस्त्यांवरील अतिक्रमणावर नगरपालिकेची कारवाई; अवैध धंद्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष की अभय?

प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून अमानुष खून; लाकूड कापायच्या मशीनने मृतदेहाचे केले तुकडे|फलटण तालुका हादरला

अपघाताचा बनाव उघड करुन सस्तेवाडीतील खुनाला वाचा फोडण्यात फलटण ग्रामीण पोलीसांना यश !

error: Content is protected !!