सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

1.5 टनाचा तो रानगवा सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडला!

On: February 28, 2026 5:49 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – फलटण तालुक्यातील मौजे विडणी येथे शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ राजेंद्र सदाशिव जाधव (वय 69) यांच्यावर गवा या वन्यप्राण्याने हल्ला केला. जखमी जाधव यांच्यावर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच Maharashtra Forest Department च्या फलटण विभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली व गव्याचा शोध सुरू केला. पुढील तपासात कोकरेवाडी येथील ऊसशेतीमध्ये गवा लपल्याची खात्री झाल्यानंतर परिसरात बंदोबस्त ठेवत ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या नियोजनाखाली बावधन (पुणे) येथील रेस्क्यू टीम तसेच कोल्हापूर येथील RRT पथकाला पाचारण करण्यात आले. सुमारे 1.5 टन वजनाच्या गव्याला पकडणे अत्यंत अवघड होते.
ड्रोन सर्व्हे करून गव्याचे अचूक लोकेशन निश्चित करण्यात आले. त्यानंतर डार्ट मारून त्याला बेशुद्ध करण्यात आले व सुरक्षितरीत्या रेस्क्यू व्हॅनमधून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सुमारे साडेचार तास चाललेल्या या थरारक मोहिमेचा यशस्वी शेवट झाला.
रेस्क्यू मोहिमेदरम्यान उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी (फलटण) निकिता बोटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी (वडुज) नितीन आटपडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी (दहिवडी) अमित मुळीक, वनपरिक्षेत्र अधिकारी (खंडाळा) मारुती निकम, तसेच त्यांचे अधिनस्त वनकर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी फाळके व पवार, पोलिस कर्मचारी उपस्थित होते. विडणी गावचे पोलिस पाटील, सरपंच व ग्रामस्थांचेही सहकार्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!