सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणच्या गिरवीचा सुपुत्र विशाल वाघ PSI मध्ये राज्यात प्रथम

On: March 6, 2026 3:13 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात फलटण तालुक्यातील गिरवी गावचा सुपुत्र विशाल नारायण वाघ याने घवघवीत यश संपादन केले आहे. विशाल वाघ याची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने निवड झाली असून राज्य कर निरीक्षक (STI) पदासाठीही त्याची राज्यात 28 व्या क्रमांकाने निवड झाली आहे.
विशाल वाघ याने PSI पदासाठी लागणाऱ्या शारीरिक चाचणीची तयारी फलटण येथील योद्धा करिअर अकॅडमीमध्ये संस्थापक व मार्गदर्शक रणजीत तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती.
विशाल वाघ यांचे शिक्षण कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथे 2021 मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्यांनी एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू ठेवली होती. या यशानंतर बोलताना त्यांनी सांगितले की, “माझ्या आई-वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत मला शिक्षण दिले. त्यांच्या कष्टाचे चीज झाले. माझी बहीण तनश्री हिने देखील राज्यसेवा परीक्षेत निरीक्षण अधिकारी (पुरवठा) पदासाठी यश मिळवले आहे. आम्ही दोघांनीही आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून शिक्षण पूर्ण केले. हे यश मी माझ्या आई-वडिलांना समर्पित करतो.”
तसेच PSI पदासाठीच्या शारीरिक तयारीत योद्धा करिअर अकॅडमीचे संस्थापक रणजीत तांबे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले, असेही त्यांनी नमूद केले. भाऊ-बहिणीला मिळालेल्या या यशामुळे त्यांच्या आई-वडिलांसह आजी यांनाही मोठा आनंद झाला आहे.
लोकशाही भारतशी बोलताना विशाल वाघ यांनी सांगितले की, STI पदासाठीचे प्रशिक्षण मुंबई येथील माझगाव येथे पूर्ण झाले असून पुढील 20 ते 25 दिवसांत जॉइनिंग होणार आहे. PSI पदासाठी अजून सहा ते सात महिने प्रशिक्षणाला वेळ असल्याने तोपर्यंत मी STI पदावर काम करणार असून त्यानंतर PSI पदासाठी प्रशिक्षण घेऊन पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा करण्याची माझी इच्छा आहे.

हे ही वाचा  केबी चे असिस्टंट जनरल मॅनेजर श्री. हेमंत खलाटे यांच्या शुभहस्ते लोकशाही भारत दिवाळी विशेषांक प्रकाशित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!