मुंबई – लोकशाही भारत न्यूज नेटवर्कच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त “आनंदी जीवन” या विशेष विषयावर आधारित विशेषांक प्रकाशित करण्यात येत आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये प्रत्येकाला आनंदी, समाधानी आणि सकारात्मक जीवन कसे जगता येईल याविषयी मार्गदर्शन, अनुभव आणि विचार समाजापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा विशेषांक काढण्यात येत आहे.
या विशेषांकासाठी “आनंदी जीवन” या मूळ विषयावर विविध स्तरातील व्यक्तींकडून लेख आमंत्रित करण्यात येत आहेत. समाजातील मान्यवर व्यक्ती, लेखक, कवी, शिक्षक, डॉक्टर, मानसशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक यांनी आपल्या अनुभवांवर, विचारांवर किंवा मार्गदर्शनपर लेख पाठवावेत.
लेखामध्ये आनंदी जीवन जगण्याचे तत्त्वज्ञान, सकारात्मक विचार, आरोग्यदायी जीवनशैली, कुटुंबातील आनंद, सामाजिक नातेसंबंध, मानसिक आरोग्य, संस्कार, यशस्वी जीवनातील आनंदाचे महत्त्व अशा विविध अंगांनी विषय मांडता येईल.
प्राप्त झालेल्या लेखांमधून निवडक आणि दर्जेदार लेख लोकशाही भारतच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या “आनंदी जीवन” विशेषांकात छापून प्रकाशित करण्यात येतील. यामधून समाजात सकारात्मक विचारांची प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
इच्छुक लेखकांनी आपले लेख शक्य तितक्या लवकर खालील ईमेलवर किंवा व्हाट्सअप वर पाठवावेत.
लेख पाठवण्याचा ईमेल :
📧 lokshahibharatnews2@gmail.com
📧 akashadhav333@gmail.com
व्हाट्सअप क्रमांक 9370729808, 9370709351
अंतिम मुदत 16/03/2026







