फलटण – डॉ. प्रसाद जोशी यांना ‘उषा-वैभव’ पुरस्कार जाहीर
फलटण : या वर्षीचा प्रतिष्ठित ‘उषा-वैभव’ पुरस्कार डॉ. प्रसाद जोशी यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा रविवार, दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी सजाई गार्डन, फलटण येथे संपन्न होणार आहे.
या सोहळ्यात मा. उषा मंगेशकर यांच्या हस्ते डॉ. जोशी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे तसेच प्रख्यात पत्रकार प्रसन्न जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या निमित्ताने अनुबंध कला मंडळ यांच्या वतीने ‘Magical RD Night’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमात विविध कलाविष्कार सादर होणार आहेत.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असला तरी प्रवेशिका आवश्यक आहेत. इच्छुकांनी खालील ठिकाणी संपर्क साधून प्रवेशिका घ्याव्यात, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
प्रवेशिका उपलब्ध ठिकाणे :
जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण
काव्या ब्यूटिक, डी.एड. चौक, फलटण
प्रॉमिस टेलर, डेक्कन चौक, फलटण
डॉ. प्रसाद जोशी यांना ‘उषा-वैभव’ पुरस्कार जाहीर; मा. उषा मंगेशकर यांच्या हस्ते होणार प्रदान
By Team LBNN
On: March 27, 2026 6:06 PM
---Advertisement---











