फलटण – लोकशाही भारत न्यूज नेटवर्कचा चौथा वर्धापन दिन विशेषांकाच्या रूपाने साजरा होत आहे. यानिमित्त “आनंदी जीवन” हा विशेषांक प्रकाशित करण्यात झाला आहे.
गेल्या चार वर्षांपासून लोकशाही भारत न्यूजने निर्भीड, निष्पक्ष आणि रोखठोक पत्रकारितेचा ध्यास घेत सातत्याने काम केले आहे. सामान्यांच्या प्रश्नांपासून सुरुवात करत आज लोकशाही भारत न्यूजने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, उद्योग,सांस्कृतिक, क्रीडा, सहकार प्रशासकीय आदी सर्व क्षेत्रांतील बातम्या प्रसारित करून पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
कोणतेही मोठे प्रारंभीचे पाठबळ नसताना शून्यातून सुरू केलेली ही वाटचाल आज एका नव्या उंचीवर पोहोचली आहे. लोकशाही भारतच्या अधिकृत YouTube न्यूज चॅनलचे आतापर्यंत 59 हजार सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. तसेच न्यूज पोर्टललाही तीन मिलियनहून अधिक वाचकांनी भेट दिली आहे.
लोकशाही भारतच्या विविध विशेषांकांनाही वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लवकरच लोकशाही भारतचे नियमित वृत्तपत्रही वाचकांच्या पसंतीस उतरेल हा विश्वास आहे.
चौथा वर्धापन दिन साजरा होत असताना वाचक व दर्शकांची साथ लाभलीच, त्याचबरोबर लोकशाही भारत न्यूज परिवारासहित हितचिंतक व जाहिरातदारांनी दिलेल्या वेळोवेळी पाठिंब्यामुळे लोकशाही भारत आज पत्रकारितेच्या क्षेत्रात भक्कमपणे उभा आहे.यासोबतच कवी आणि लेखकांनी दिलेले साहित्य सहकार्यही अत्यंत मोलाचे ठरले आहे. लोकशाही भारत न्युज चे कायदेशीर सल्लागार एडवोकेट आकाश आढाव, क्रिएटिव्ह हेड सौ प्रमिला चव्हाण आणि कार्यकारी संपादक रुतीक मोरे या आमच्या टीमचे सुद्धा मनःपूर्वक धन्यवाद!!









