सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सेवाहक्क दिनानिमित्त फलटण तालुक्यात जनजागृती उपक्रम

On: April 27, 2026 11:20 PM
Follow Us:

शासकीय कार्यालये व ग्रामपंचायतींमध्ये विशेष सभा; सेवाहक्क अधिनियम 2015 चे वाचन

फलटण – सेवाहक्क दिनानिमित्त फलटण तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये व ग्रामपंचायतींमध्ये विशेष सभा आयोजित करण्यात येणार असून, या सभांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील ठळक तरतुदींचे वाचन करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने सर्व ग्रामपंचायतींमध्ये सेवाहक्क अधिनियम अंतर्गत सूचना फलक लावणे तसेच अधिसूचित सेवा व शुल्क यांची माहिती देणारे QR Code लावण्याचे काम सुरू आहे. यासोबतच गट शिक्षणाधिकारी यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
शासन निर्णय दि. 28 जानेवारी 2025 नुसार वितरीत करण्यात आलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत अधिनियमांतर्गत अधिसूचित सर्व ऑनलाईन सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.
दरम्यान, दि. 1 एप्रिल 2025 ते 30 मार्च 2026 या कालावधीत फलटण तालुका महसूल विभागाकडून एकूण 65,335 प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. त्यामध्ये उत्पन्न प्रमाणपत्रे (32,877), अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रे (9,613), जात प्रमाणपत्रे (10,407), नॉनक्रिमिलेयर प्रमाणपत्रे (8,765), अल्पभूधारक प्रमाणपत्रे (760), ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्रे (720), केंद्र सरकार EWS प्रमाणपत्रे (1,137) व इतर प्रमाणपत्रे (1,056) यांचा समावेश आहे. सर्व प्रमाणपत्रे विहित कालावधीपेक्षा कमी वेळेत देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
नागरिकांनी शासनाच्या विविध विभागांकडून उपलब्ध असलेल्या सेवांचा लाभ घ्यावा तसेच सेवा देण्यात उशीर, अतिरिक्त शुल्क आकारणी किंवा कोणतीही कमतरता आढळल्यास सेवाहक्क अधिनियमानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन फलटण तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी  केले आहे.

हे ही वाचा  शरयु साखर कारखाना बॉयलर पूजन व अग्नी प्रदीपन विधिवत संपन्न

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!