सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

अभयसिंह जगतापांच्या विजयासाठी पडद्यामागे ‘मास्टर प्लॅन’? सांगली-सातारा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची चर्चा!

On: June 5, 2026 9:53 AM
Follow Us:

सातारा – सांगली-सातारा  विधानपरिषद निवडणुकीत अर्ज माघारीनंतरचे चित्र स्पष्ट झाले असून आता मुख्य सामना भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्यात होत आहे. महायुतीतील बंडखोरी शांत झाल्यानंतर निवडणुकीतील राजकीय गणितांवर सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

महायुतीकडून शिवसेनेचे तानाजीराव पाटील यांनी अर्ज मागे घेतल्याने धैर्यशील कदम यांच्यासमोरील अंतर्गत अडथळा दूर झाला आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जुन्या राजकीय संघर्षांचे पडसाद या निवडणुकीत उमटू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

विशेषतः जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक संस्थांमधील सत्तासंघर्ष, नाराजी आणि पूर्वीच्या राजकीय घडामोडींचा विचार करून काही गटांकडून अभयसिंह जगताप यांच्या विजयासाठी पडद्यामागे रणनीती आखली जात असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पातळीवरील वैयक्तिक राजकीय समीकरणे मतदानावर प्रभाव टाकू शकतात, असे निरीक्षकांचे मत आहे.

दरम्यान, या मतदारसंघात सहकार, शिक्षण संस्था, साखर कारखाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रभाव महत्त्वाचा मानला जात असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे संभाव्य क्रॉस व्होटिंग, नाराज गटाची भूमिका आणि शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेली मतांची जुळवाजुळव यामुळे निवडणुकीची उत्सुकता अधिक वाढली आहे.

मात्र, सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणाचा परिणाम प्रत्यक्ष मतदानात किती प्रमाणात दिसून येतो आणि त्याचा अंतिम निकालावर किती प्रभाव पडतो, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या तरी या निवडणुकीत भाजप आणि शरद पवार गट यांच्यातील थेट संघर्षासोबतच स्थानिक राजकीय समीकरणांचीही मोठी परीक्षा लागणार असल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा  सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकसहभागातून काम करणार – कुणाल काकडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!