सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

दसऱ्याला महालक्ष्मीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; चार मित्रांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

On: October 21, 2026 6:01 PM
Follow Us:

वडूज – सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दसऱ्यानिमित्त कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन स्कॉर्पिओ गाडीतून गावाकडे परतणाऱ्या सात मित्रांच्या गाडीला कराडजवळील पुणे-बेंगळुरू महामार्गावरील नव्या सहापदरी उड्डाणपुलावर रात्री सुमारे अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव स्कॉर्पिओ गाडीने ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने गाडीचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत तेजस देशमुख (वय २५), सागर निंबाळकर (वय २३), सुयश चिंचकर (वय २१) आणि रोहित धोत्रे (वय २१) या चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात ऋतुराज दुबळे, शांतनु शिंगाडे आणि अमन तांबोळी हे अन्य तीन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दसऱ्याच्या सणानिमित्त देवीचे दर्शन घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या चार मित्रांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कातरखटाव गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा  ३ तासांचा इशारा : सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

रणजितसिंह ना. निंबाळकर यांची सातारा जिल्हा बँकेत बिनविरोध निवड; प्रथमच संचालक मंडळात प्रवेश!

फलटण तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू देणार नाही : आमदार सचिन पाटील

“युवा महोत्सवातून तणावमुक्ती व सर्जनशीलतेला शास्त्रीय अधिष्ठान”— प्रा. डॉ.श्रीमती ज्योती जाधव

आमदार सचिन पाटील यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध; महेंद्र सूर्यवंशी – बेडके  यांची टीका

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

फलटणमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) गावागावात पक्ष संघटन बळकट करणार

error: Content is protected !!