फलटण : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविषयी आमदार सचिन पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांनी निषेध केला आहे.
महेंद्र सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार सचिन पाटील यांनी वस्तुस्थिती जाणून न घेता वक्तव्य केले. संबंधित पोस्ट ही हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली नसून काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरील असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच, आमदारांनी फलटण शहर व तालुक्यातील प्रलंबित प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था, पालखी महामार्गाच्या कामाचा दर्जा, शेतकरी व बेरोजगार युवकांचे प्रश्न याकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. नुकत्याच घडलेल्या विजेचा खांब कोसळण्याच्या घटनेतील जखमींची विचारपूसही आमदारांनी केल्याचे दिसून आले नसल्याची टीकाही त्यांनी केली.
यापूर्वी फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत निषेध नोंदविण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर आता फलटण तालुका काँग्रेस चे अध्यक्ष श्री महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी आमदार सचिन पाटील यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे.
आमदार सचिन पाटील यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध; महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांची टीका
By Team LBNN
On: August 6, 2026 5:31 PM












