सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण नगरपालिका निवडणुक राजे गटाकडून लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये चैतन्याचे वातावरण

On: November 7, 2025 2:16 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण : फलटण नगरपरिषदेची निवडणूक सन २०२५ नुकतीच जाहीर करण्यात आली असून, सोमवार दिनांक १० नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा कार्यक्रम आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झाला आहे.

गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ रोजी कोळकी येथील “गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स” येथे प्रभाग क्रमांक १ ते ६ मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या वेळी अनेक उमेदवारांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन केले. संपूर्ण परिसरात कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी दिसून आली होती.

शेकडो इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून, यामध्ये अनेक मातब्बर नेत्यांनी आपल्या मातोश्रींसाठी, सौभाग्यवतींसाठी देखील राजकीय फिल्डिंग लावल्याचे दिसून आले. गोविंद डेअरी परिसरात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे वातावरण पूर्णतः निवडणूकमय बनले होते.

दरम्यान, शुक्रवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी उर्वरित प्रभागांच्या मुलाखतींचा कार्यक्रम पुढील वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे –

हे ही वाचा  चुकीच्या आहारामुळे वाढणारी मूळव्याध एक दुर्लक्षित वेदना - डॉ. शिल्पा गांधी

प्रभाग ७ : सकाळी १० ते ११

प्रभाग ८ : ११ ते १२

प्रभाग ९ : १२ ते १

प्रभाग १० : १ ते २

प्रभाग ११ : सायं. ६ ते ७

प्रभाग १२ : ७ ते ८

प्रभाग १३ : ८ ते ९

या मुलाखतींना इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह उपस्थित राहण्याचे आवाहन राजे गटाच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

अभयसिंह जगताप यांचा पुन्हा एकदा सुसंस्कृतपणा भावला; पराभवानंतरही निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आभार मेळावा

राष्ट्रवादीचे चेतन शिंदे फलटण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या राजे गटासोबत?

सौ.पायल अमोल पवार यांची सांगवी पंचायत समिती गणातून उमेदवारीची पक्षश्रेष्ठींकडे मागणी;महादेव कोळी समाजाला संधी द्या समाजाची आग्रही भूमिका

सह्याद्री भैया कदम यांच्या प्रवेशाने फलटण तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली – मंत्री मकरंद आबा पाटील

सौ. वैशालीताई कांबळे यांना बरड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी! ;कार्यकर्त्यांची राजे गटाच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शिवसेना पक्षाच्यावतीने स्वबळावर लढवा – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

error: Content is protected !!